Maharashtra Budget Session 2024: राज्याच्या अर्थसंकल्पात झाल्या या मोठया घोषणा!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 2024-25 वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून त्यांनी राज्याच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. या घोषणांमध्ये, जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारण्यात येणार, राज्यात 18 वस्त्रोद्योग उभारले जाणार, वर्षभरात नवी मुंबईत विमानतळ बांधले जाणार अशा घोषणांचा समावेश आहे. यासह इतर अनेक घोषणा अजित पवार यांनी केले आहेत त्या आपण जाणून घेऊया.

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा (Maharashtra Budget Session 2024)

  • राज्य सरकारने राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला आहे. त्यामुळे आता या तालुक्यांमध्ये जास्त मदत पोहोचवण्यावर सरकार भर देणार आहेत.
  • लवकरच 7 हजार 500 किमीची रस्त्याची कामे हाती घेण्यात येणार आहे. तर सार्वजनिक बांधकामांसाठी राज्य सरकार एकोणीस हजार कोटी रुपये देत आहे.
  • तसेच, जालना-यवतमाळ-पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाच्या कामासाठी सरकार 50 टक्के रक्कम देणार आहे. ही चौथी मार्गिका असणार आहे.
  • वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू पालघरपर्यंत करण्यात येणार असल्याची घोषणा आज अजित पवार यांनी केली आहे. तर, रत्नागिरी भागवत बंदरसाठी 300 कोटी रुपयांची तरतूद सरकारने केली आहे.
  • तसेच, हर घर हर नल योजनेअंतर्गत 1 कोटी नळ जोडणीचे उद्दिष्ट सरकारचे आहे. याची माहिती आजच्या विधिमंडळात अजित पवार यांनी दिली आहे.
  • आनंद शिधा वाटपात एक महिला एक साडी देण्याची योजना देखील सरकारने आखली आहे.
  • येत्या काळात राज्यात 18 वस्त्रोद्योग उभारले जाणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.(Maharashtra Budget Session 2024)