Maharashtra Budget Session 2024 | राज्यांतील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर!! अर्थसंकल्पात मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra Budget Session 2024 | आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सध्या राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जात आहे. याबाबत नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. या अर्थसंकल्पात आता राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना नक्की काय फायदा होणार आहे? त्यांच्या हिताची कोणते निर्णय घेतले जाणार आहे? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे.

कुसुमाग्रजांना अभिवादन करून अजित पवार यांनी अर्थसंकल्पाला ( Maharashtra Budget Session 2024)सुरुवात केली. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी सुरुवातीला जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार असल्याची माहिती सांगितली. तसेच त्यावेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील आभार मानले. त्याचप्रमाणे अटल सेतू पोस्टल रोडला जोडण्यासाठी 2 बोगद्यांची निर्मिती करत असल्याची देखील माहिती सांगितली. तसेच राज्यातील गुंतवणुकी वाढवण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अजित पवारांनी आपल्या देशामध्ये 6 वंदे एक्सप्रेस सुरू करणार असल्याचे सांगितले. नगर विकास विभागासाठी 10 हजार कोटी बांधकाम विभागासाठी 19900 कोटी त्याचप्रमाणे सामान्य प्रशासन (Maharashtra Budget Session 2024) विभागाला 1000 कोटी दिले जाणार असल्याची माहिती दिली. तसेच 18 लघुवस्त्रोद्योग संकुल स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

रात्री उड्डाण सेवा सुरु राहणार

यावेळी त्यांनी रेल्वे प्रकल्पात भरीव तरतूद करण्याबद्दलची माहिती सांगितली. तसेच मार्च 2015 पर्यंत मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा होणार असल्याची माहिती दिली. नवी मुंबई विमानतळ वर्षभरात सेवेत येणार आहे तर संभाजीनगर विमानतळ विस्तारासाठी आर्थिक तरतूद केली जाणार आहे. त्याचप्रमाणे रात्रीचे उड्डाण घेण्यासाठी सेवा सुरू केली जाईल. असे अजितदादा पवार यांनी यावेळी सांगितले.

वीज दरात सवलत | Maharashtra Budget Session 2024

सर्वसामान्य नागरिकांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. यावेळी त्यांनी सांगितले की, आता शिधापत्रिकेवर एका साडीचे वितरण केले जाणार आहे तसेच 300 युनिटपर्यंत मोफत वीज सामान्य नागरिकांना दिली जाईल . माझी वसुंधरा या योजनेसाठी विशेष तरतूद केली जाणार असणार आहे. त्याचप्रमाणे अंगणवाड्यांना सौर ऊर्जा पुरवले जाणार आहे. वीजदर सवलतीत एक वर्षाचे मुदतवाढ देखील केली जाणार आहे.

40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित

ग्रामीण विभागात एक कोटी 46 लाख नळ जोडणी योजना आहे. (Maharashtra Budget Session 2024) त्याचप्रमाणे रत्नागिरी भागवत बंदरसाठी 300 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. आणि 7000 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार केले जाणार आहेत. तसेच राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला जाणार आहे अशा प्रकारची माहिती त्यांनी त्यांच्या या अर्थसंकल्पात जाहीर केलेली आहे.