Maharashtra Bus Depot : 840 बस डेपोंचा कायापालट करणार; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Bus Depot
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra Bus Depot । येत्या दोन वर्षांमध्ये एसटीचा चेहरामोहरा बदलणार, महाराष्ट्र सरकार पुढील २ वर्षात २५,००० नवीन बसेस खरेदी करणार, तसेच ८४० बस डेपोंचे रूपांतर बस पोर्ट मध्ये करणार अशी मोठी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाचा २ वर्षाचा प्लॅनच सांगून टाकला. राज्य वाहतूक व्यवस्थेबाबत परिषदेचे सदस्य अ‍ॅड अनिल परब, शशिकांत शिंदे, सदाभाऊ खोत आणि इतरांनी सुरू केलेल्या अर्ध्या तासाच्या चर्चेला उत्तर देताना प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली.

प्रताप सरनाईक म्हणाले, महाराष्ट्रात सध्या सुमारे १४,५०० बसेस आहेत, त्यापैकी बहुतेक बस या जुन्या आहेत. अशावेळी ताफ्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी, सरकार पुढील पाच वर्षांत २५,००० नवीन बसेस खरेदी करण्याची योजना आखत आहे. यामध्ये ५,१५० बस या इलेक्ट्रिक बस असतील. याव्यतिरिक्त, राज्यातील ८४० बस डेपो आधुनिक “बस पोर्ट” मध्ये रूपांतरित (Maharashtra Bus Depot) केले जातील. या अपग्रेडसाठी निविदा प्रक्रिया आधीच सुरू आहे आणि ती पारदर्शक पद्धतीने केली जाईल, असे आश्वासन प्रताप सरनाईक यांनी दिले.

कोणकोणत्या सुविधा मिळणार? Maharashtra Bus Depot

ते पुढे म्हणाले, आधुनिकीकरण उपक्रमाचा एक भाग म्हणून, बस आणि डेपोच्या स्वच्छतेवर (Maharashtra Bus Depot) आणि प्रवाशांच्या सुविधा वाढवण्यावर विशेष लक्ष दिले जाईल. प्रत्येक डेपोमध्ये ई-टॉयलेट, ड्रायव्हर आणि कंडक्टरसाठी गरम पाणी आणि कपडे धुण्याची सेवा यासारख्या सुविधा असतील अशी माहिती सरनाईक यांनी दिली. प्रताप सरनाईक यांनी यावेळी गुजरातच्या यशस्वी बस पोर्ट मॉडेलचा उल्लेख करत अशाच मॉडेलचा फायदा महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागांना होईल अशी आशा व्यक्त केली. सरनाईक यांच्या घोषणेमुळे एसटी विभागाचा कायापालट होईल, तसेच प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येईल. बस कर्मचाऱ्यानाही या घोषणेमुळे दिलासा मिळाला आहे.