काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र पहिले राज्य!! एवढ्या कोटींमध्ये झाला व्यवहार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गेल्या काही दिवसांपूर्वीच झालेल्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काश्मीरमध्ये (Kashmir) देखील महाराष्ट्र भवन उभारले जाईल अशी घोषणा केली होती. त्यानंतर आता बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काश्मीरच्या श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन (Maharashtra Bhavan) उभारणीस मंजुरी देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, काश्मीरमध्ये स्वतंत्र भवन उभारण्यासाठी जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य बनले आहे. महाराष्ट्र भावनाची निर्मिती झाल्यानंतर राज्यातून काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांच्या गैरसोयी टळणार येणार आहे.

महाराष्ट्रातून काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांच्या गैरसोय होऊ नये किंवा त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठीच काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन उभारले जात आहे. या पार्श्वभूमीवरच सरकार काश्मीरमध्ये जमिन खरेदी करणार आहे. त्यामुळे या भावनासाठी काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरणार आहे. जमीन खरेदी केल्यानंतर काश्मीरमध्ये महाराष्ट्रातील स्वातंत्र्य इमारत उभारली जाईल. विशेष म्हणजे काश्मीरमध्ये स्वतःचे भवन उभारणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असणार आहे.

8.16 कोटी रुपयांमध्ये जमीन खरेदी

राज्य सरकारकडून महाराष्ट्र भवनाची इमारत मध्य काश्मीरच्या बडगाममध्ये बांधली जाणार आहे. त्यामुळेच या ठिकाणी जमीन खरेदी करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सरकार श्रीनगर विमानतळाच्या जवळील इचगाम येथे तब्बल 2.5 एकर जमीन खरेदी करणार आहे. यासाठी जम्मू कश्मीर सरकारने देखील महाराष्ट्र सरकारला 8.16 कोटी रुपयांमध्ये जमीन हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. दरम्यान महाराष्ट्रातून जम्मू-काश्मीरला जाणाऱ्या पर्यटक आणि अधिकाऱ्यांना आरामदायी निवास आणि सुविधा देण्यासाठी सरकारकडून काश्मीरमध्ये महाराष्ट्र भावनांची निर्मिती करण्यात येत आहे.