महत्वाची बातमी ! राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

0
23
rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राज्यात एकीकडे उन्हाळ्याची तीव्रता वाढली असताना हवामान खात्याकडून एक नवी अपडेट राज्यासाठी करण्यात आली आहे. राज्यातल्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान रविवारी राज्यातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण होते सायंकाळी मात्र आकाशात ढगांची गर्दी झाली होती पण पाऊस काही आला नाही.

24 तासात राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार येथे 24 तासात राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या 24 तासासाठी हा इशारा दिला संघाला प्रचंड उष्णता वाढली आहे हवामानच्या स्थितीत सातत्याने बदल होत आहे. तापमान बऱ्याच ठिकाणी घटलेले दिसून येत असले तरी उकाड्यात मात्र वाढ झाली आहे.

तापमानात वाढ

मिळालेल्या माहितीनुसार उष्ण दमट वातावरण राहण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा दबाव आणि समुद्रातील तापमानामुळे पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टी क्षेत्रावर पावसाचा सावट असतानाच विदर्भात सातत्याने उकाडा जाणवतोय. चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यात कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यात देखील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे.

भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारपासून एक पश्चिमी झंजावात सक्रिय होत आहे. त्यामुळे पर्वतीय भागांमध्ये हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोमवारी जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात भरपूर बर्फवृष्टी सह तापमान बिघडण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर उत्तराखंडच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस आणि हलकी बर्फवृष्टी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.