अन राज्यपाल आमदार पाडवींवर भडकले, पुन्हा घ्यायला लावली शपथ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज संपन्न झाला. महाविकासआघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विविध आमदारांना राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान काँग्रेस आमदार के.सी. पाडवी जेव्हा शपथ घेतली तेव्हा राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांना चांगलाच खडसावलं.

आमदार पाडावी यांनी शपथविधीचा प्रोटोकॉल मोडत शपथविधीचा मजकूर सोडून आपल्याकडील लिहून आणलेला मजकूर वाचून दाखवला. ज्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पाडवी यांच्यावर चांगलेच भडकले. स्वतःच्या मनातला मजकूर वाचायचा नाही, शपथ कशी घ्यायची असते? हे एकदा समोर शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे बसले आहेत त्यांना विचारा असंही त्यांनी सुनावत पाडावी यांना पुन्हा शपथ घायला लावली.

नेमकं काय घडलं ..

“येथे मी निसर्गासमोर नतमस्तक होतो, माझ्या मतदारांचे मी आभार मानतो. ज्यांनी मला निवडून दिलं त्यांच्यापुढे मी नतमस्तक होतो. मी माझ्या मतदारांचा ऋणी आहे ” ही काही वाक्यं पाडवी यांनी लिहून आणली होती. ती शपथ पूर्ण झाल्यावर त्यांनी वाचून दाखवली. ज्यावर राज्यपाल कोश्यारी चांगलेच भडकले. शपथ घ्यायची ही पद्धत नसते. जेवढं लिहून दिलं आहे तेवढंच वाचा. तुम्हाला शपथ कशी घ्यायची ते ठाऊक नसेल तर समोर शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे बसले आहेत त्यांना विचारा असं म्हणत राज्यपालांनी पाडवी यांची कानउघडणी केली.