दत्तक घेतलेल्या गावातच उदयनराजेंना झटका; ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनलचा दारुण पराभव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जवळपास हाती आले आहेत. राजकीय पलटवार आणि प्रतिस्पर्ध्यांच्या राजकीय वजनाच्या बळावर होणारा सत्तापालट असंच काहीसं चित्र बहुतांशी ग्रामपंचायतींमध्ये पाहायला मिळत आहे. तुल्यबळ नेतेमंडळींच्या गावावर कोणत्या गटांचं वर्चस्व पाहायला मिळतं, हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरत आहे, कारण पुढं इथूनच राज्याच्या राजकारणावरही याचे परिणाम दिसून येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

अशातच राज्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे. उदयनराजे यांना त्यांनी दत्तक घेतलेल्या गावातच मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या ठिकाणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने विजय मिळवला आहे.

साताऱ्यातील कोंडवे हे गाव उदयनराजे यांनी दत्तक घेतलं होतं. या गावात उदयनराजे गटाने जोरदार प्रचार देखील केला होता. तरीही त्यांना यश प्राप्त करता येऊ शकलेलं नाही. कोंडवे ग्रामपंचायतीत उदयनराजे गटाला १३ जागांपैकी केवळ ३ जागा मिळाल्या आहेत. तर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने १० जागांवर मुसंडी मारली आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment