‘महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीच झुकला नाही’, जयंत पाटलांची भाजपवर सडकून टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची स्वाभिमानी सभा पार पडली. या सभेला शरद पवार गटाचे आमदार आणि खासदार उपस्थित होते. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसेच “जेव्हा देशात दिल्लीश्वरांचे राज्य होते, तेव्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी खऱ्या अर्थाने मराठी भूमीला स्वाभिमानाची जाणीव करून दिली. त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनीही आपल्या पित्याच्या स्वाभिमानाची परंपरा पुढे चालवली. ‘महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीच झुकला नाही’ असे ही भाजपला सुनावले.

इतकेच नव्हे तर, “महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी सुडाचे राजकारण नाही, तर प्रेमाचे राजकारण केले. यामुळे आजही ते जनमानसात जिवंत आहेत. आज अनेकजण राजकीय स्वार्थापोटी सुडाचे राजकारण करत समाजात वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आराेपही त्‍यांनी केला. राष्‍ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरूगांत गेले. त्‍यांनी सुडाच्या राजकारणा विरोधी लढत देशातील युवकांपुढे वेगळा आदर्श घालून दिला आहे” असेही जयंत पाटील यांनी म्हणले.

दरम्यान, आजच्या भाषणात शरद पवार यांनी भाजपवर आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारवर “समाजात अंतर निर्माण होईल याची खबरदारी आजच्या राज्यकर्त्यांकडून घेतली जात आहे. खतांची किंमत वाढली आहे. त्यामुळे या सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. स्त्रियांची धिंड काढली जात आहे, पण भाजप गप्प आहे. मणिपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र यांनी जायची गरज होती. अधिवेशनात अविश्वास ठराव आल्यावर ते शेवटच्या काही मिनटात बोलले. सत्तेचा गैरवापर करणाऱ्या लोकांना आवरायची वेळ आली आहे” असे शरद पवार यांनी म्हणले आहे.