Maharashtra Highway: राज्यातील याठिकाणी बनणार 3 नवे महामार्ग; पहा कसा असेल रूटमॅप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra Highway| गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने राज्यातील विविध महामार्ग आणि रस्ते विकासाच्या कामावर अधिक भर दिला आहे. आता सरकारकडून येत्या लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर तीन नव्या महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. हे नवे महामार्ग महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणात बनवण्यात येतील. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. तसेच राज्यातील विकासात आणखी भर पडेल. त्यामुळे हे महामार्ग (Maharashtra Highway) नेमके कुठे बनवण्यात येतील? त्यांचा रूटमॅप कसा असेल? याविषयी जाणून घ्या.

विरार-अलिबाग महामार्ग – हा महामार्ग 128 किलोमीटर लांबीचा असेल. विरार-अलिबाग महामार्ग प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांमध्ये 96 किलोमीटर लांबीचा मार्ग विकसित केला जाईल. ज्यात राष्ट्रीय महामार्ग(Maharashtra Highway) 8 वरील नवघर ते पेणमधील राष्ट्रीय महामार्ग 66 वरील बलावली गावापर्यंतचा समावेश असेल. या प्रकल्पाचे काम एकूण 11 पॅकेजमध्ये करण्यात येईल. याकरिता तब्बल 60 हजार कोटी रुपये खर्च केले जातील.

पुणे रिंग रोड मार्ग – पुणे रिंग रोड हा शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. हा रिंग रोड 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा असेल. या रिंग रोड प्रकल्पामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटेल. पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 136 किलोमीटर लांबीचे काम केले जाईल. हे काम 9 पॅकेजमध्ये करण्यात येईल. या प्रकल्पासाठी तब्बल 16 हजार कोटी रुपये खर्च होतील.

जालना-नांदेड समृद्धी महामार्ग – जालना ते नांदेड महामार्ग b 190 किलोमीटर लांबीचा असेल. या महामार्गामुळे समृद्धी महामार्गाचा विस्तार नांदेडपर्यंत होईल. तसेच हा महामार्ग मराठवाड्यातील विकासाला ही चालना देईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जालना-नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे काम एकूण 6 पॅकेजमध्ये पूर्ण करण्यात येईल. जालना-नांदेड मार्ग बनवून पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांचा वेळही वाचेल.

निवडणुकीनंतर कामाला सुरुवात

सध्या राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष प्रचार, सभा, बैठका अशा कामात गुंतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील या तिन्ही नवीन महामार्गांचे काम लोकसभा निवडणुका झाल्यानंतर सुरू करण्यात येणार आहे. यामुळे महामार्गाच्या (Maharashtra Highway) कामाकडे व्यवस्थितरित्या लक्ष देता येईल.