ठरलं तर!! २७ ते ३० मार्चदरम्यान रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार

0
1
Maharashtra Kesari Kusti
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च सन्मानाची असणारी ६६ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा (Maharashtra Kesari Competition) यंदा कर्जतमध्ये मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे. येत्या २७ ते ३० मार्चदरम्यान या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील अव्वल मल्ल आपली कुस्ती कौशल्ये अजमावणार आहेत.

महत्वाचे म्हणजे, यंदाची स्पर्धा आमदार रोहित पवार (Rohit Pawar), कर्जत तालुका तालीम संघ आणि नगर जिल्हा तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र केसरी हा राज्यातील कुस्तीगीरांसाठी सर्वोच्च किताब मानला जातो. यंदाच्या स्पर्धेत मातीत आणि गादी या दोन्ही प्रकारांतील पहिलवान आमनेसामने येणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांतील सर्वोत्तम कुस्तीगीर या स्पर्धेत आपले कसब आजमावणार आहेत, त्यामुळे स्पर्धेतील चुरस अतिशय रंगतदार होणार आहे.

उत्कृष्ट नियोजन आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा

खास म्हणजे, या भव्य स्पर्धेचे आयोजन अत्यंत उच्च दर्जाचे करण्यासाठी स्वतः रोहित पवार यांनी विशेष लक्ष घातले आहे. कर्जत तालुका तालीम संघ आणि नगर जिल्हा तालीम संघाने सर्व तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदान, उत्कृष्ट निवास व्यवस्था आणि खेळाडूंना आवश्यक सर्व सुविधा पुरवण्यात येणार आहेत. स्पर्धेमध्ये पात्र ठरण्यासाठी मल्लांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमानुसार जिल्हास्तरीय स्पर्धांमधून निवडले जाईल. अंतिम विजेत्याला प्रतिष्ठेचा “महाराष्ट्र केसरी” किताब आणि मानाची गदा देण्यात येईल.

कुस्तीप्रेमींमध्ये या स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता असते. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रेक्षक मैदानावर उपस्थित राहणार आहे. ही बाब लक्षात घेऊनच विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यासह लाईव्ह स्ट्रीमिंग आणि सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण ही करण्यात येणार आहे.