Maharashtra krushi Din | केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणल्यात या योजना; जाणून घ्या सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra krushi Din | शेती हा आपल्या भारतातील अनेक लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे आपल्या भारताची जवळपास 50% पेक्षा जास्त अर्थव्यवस्था ही शेती अवस्थेवर अवलंबून आहे. आज शेतकरी शेतात घाम गाळतो, कष्ट करतो, अन्न पिकवतो. त्यामुळे त्याच देशातील इतर लोक हे सुखाने चार घास खाऊ शकतात. तर शेतकऱ्यांनी बंड केला आणि शेती केली नाही तर लोकांना तरी काय? आणि यासाठीच आज म्हणजेच 1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिन (Maharashtra krushi Din) साजरा केला जातो. यामध्ये 1 जुलै ते 7 जुलै या दरम्यान कृषी सप्ताह साजरा केला जातो. हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात त्यांचे खूप जास्त योगदान दिले आहे. आणि या योगदानानिमित्त त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.

शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे. त्याचप्रमाणे त्यांना शेती क्षेत्रात प्रगती करता यावी. यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केलेल्या आहे. अगदी सिंचनापासून ते आर्थिक मदतीपर्यंत सगळ्या सुविधा शेतकऱ्यांना दिल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप जास्त फायदा होतो. शेतकरी त्यांच्या व्यवसायात चांगला चांगली प्रगती करू शकतात. त्याचप्रमाणे त्यांना आर्थिक मदत झाल्याने बी बियाणे आणणे. या सगळ्याला देखील मदत होते. राज्यातील जवळपास कोट्यावधी शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळत आहे. आता केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना कोणत्या योजना मिळतात? हे आपण पाहणार आहोत.

पंतप्रधान पिक विमा योजना | Maharashtra krushi Din

निसर्गाच्या अवकाळी संकटामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी. यासाठी सरकारने ही पंतप्रधान पिक विमा योजना सुरू केलेली आहे. जेव्हा शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे, कीड किंवा दुष्काळामुळे पिकांचे नुकसान होते. त्यावेळी या विमा अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत सरकारकडून केली जाते.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना

केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक लोकप्रिय योजना आहे. देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालेला आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. हे 6 हजार रुपये 3 समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केले जातात. देशातील कोणताही शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो.

किसान क्रेडिट कार्ड

केंद्र सरकारने 1998 मध्ये किसान क्रेडिट कार्ड ही योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी त्याचप्रमाणे शेतीतील खर्चासाठी पुरेशी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना लागू केलेली आहे. आपण इतर मार्गाने जर कर्ज घेतले, तर त्यावर तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागते. परंतु सरकारने चालू केलेल्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी कर्जासाठी वार्षिक 4 टक्के सवलतीच्या दराने कर्ज दिले जाते. याचा शेतकऱ्यांना फायदा होतो.