मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह मोहितेंचा भाजप प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपले वडील विजयसिंह मोहिते पाटील वगळता सर्व कुटुबीयांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. मुंबईत वानखेडे स्टेडियम शेजारी गरवारे सभागृहात त्यांचा भाजपा प्रवेश पार पडला. मोदींनी केलेल्या विकासामुळेच भाजपात प्रवेश करत असल्याचं रणजितसिंह यावेळी बोलताना म्हणाले.

मोहिते घराण्याचा भाजपात योग्य मान राखला जाणार असल्याचं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटलांचं पक्षात स्वागत केले आहे. रणजितसिंह माढ्यातून भाजपाचे खासदार होणार असल्याचा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत स्टेजवर सदाभाऊ खोतही उपस्थित होते.

‘आम्हाला तुमच्याबरोबर काम करायची संधी दिलीत, तुम्ही सांगाल ते पुढे राजकारण-समाजकारण करू’ असं आश्वासनही रणजितसिंह पाटील यांनी यावेळी भाजप नेत्यांना दिला आहे. तसेच शेकडो समर्थकांसह रणजितसिंह भाजपात दाखल झालेत. रणजितसिंह यांच्यासोबतच धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरस पंचायतमधील वैष्णोदेवी मोहिते पाटील, अकलूज ग्रामपंचायत शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनीही यावेळी भाजप प्रवेश केला आहे. यामुळे सोलापूरच्या राजकारणाला चांगलाच धक्का बसला आहे

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

रणजितसिंहांचे भाषण ऐकण्यासाठी पवारांनी बैठक थांबविली…

पुरूषोत्तम जाधवांचा शिवसेनेत प्रवेश, उदयनराजे भोसलेंच्या विरोधात लढवणार लोकसभा

बैलाच्या मृत्यूने कुटुंबीय हेलावले ; लाडक्या राजाचा दशक्रिया विधी सर्वत्र चर्चेत

वसंतदादा घराण्याला संपविण्याचा प्रयत्न, विशाल पाटीलांचा जयंत पाटीलांवर हल्लाबोल

रणजीतसिंह मोहिते पाटिलांनंतर राष्ट्रवादीच्या या माजी खासदाराच्या मुलाचा भाजप प्रवेश

 

Leave a Comment