‘यांची’ आश्वासने म्हणजे ‘लबाड घरच आवताण’ – शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रत्नागिरी प्रतिनिधी | २४ फेब्रुवारीला रत्नागिरी येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या ५५ व्या राज्यव्यापी वार्षिक अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनांचा पाणउतारा केला. ‘मुख्यमंत्र्यांचं वागणं, बोलणं लबाडाच्या घरच आवताण’ असल्याची टीका शरद पवार यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी दिलेला एकही शब्द पूर्ण केला नाही.पाच वर्षापूर्वी मुख्यमंत्री यांनी बारामतीला जाऊन धनगर समाजाला आमचं सरकार आल्यावर आठ दिवसाच्या आत आरक्षण देऊ असं सांगितले होते. मात्र पाच वर्ष उलटून गेले तरी त्यांना आरक्षण भेटले नाही. तसेच महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनात तीन वर्षा पूर्वी मुख्यमंत्री आले असताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन तुम्हाला लागू करू असे सांगितले होते. तेही आश्वासन पूर्ण केले नाही.

या सर्व कारणांमुळे शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली.तेव्हा एकच हशा पिकला. मुख्यमंत्र्यांची सर्व आश्वासने हवेतच असतात.त्यांचं बोलणं म्हणजे लबाडीच आहे, असे पवार म्हणाले.
इतर महत्वाचे –

सामान्य लोकांबरोबरच सैनिकांच्या पाठीशी देखील मी ठामपणे उभा – उदयनराजे भोसले

पुण्यात कर्णबधीर विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

उदयनराजे भोसले यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहून असा केला वाढदिवस साजरा

Leave a Comment