उद्धव ठाकरेंवर केलेली टीका चांगलीच भोवली… उमेदवारी अडचणीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | भाजप खासदार किरीट सोमय्या यांची ईशान्य मुंबईतील उमेदवारी अडचणीत आली आहे. किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका केली होती, त्यामुळे त्यांना आपली उमेदवारी गमवावी लागणार आहे. किरीट सोमय्यांसह आणखी एका नावाची शिफारस करण्याची सूचना केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना केली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत किरीट सोमय्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची टीका केली होती. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये किरीट सोमय्यांबद्दल राग आहे. युती होण्या पूर्वी शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांना पाडणारच असा निर्धार केला होता. शिवसैनिकांनी थेट भाजप खासदार किरीट सोमय्या यांना विरोध केला. युतीचा उमेदवार जर किरीट सोमय्या असतील तर त्यांना पाडू असा थेट इशारा शिवसेना विभागप्रमुखांनी दिला होता.

विधानसभा निवडणुकीवेळी युती तुटल्यानंतर शिवसेनेवर सर्वाधिक टीका करुन, युतीत दरी निर्माण करणारे भाजप खासदार किरीट सोमय्यांवर शिवसैनिक आजही भयंकर संतप्त आहेत. किरीट सोमय्या हें शिवसेना- भाजप युतीचे असतील, तर शिवसेना किरीट सोमय्यांना पाडणार, असा पण शिवसैनिकांनी केल्याचं शिवसेना विभागप्रमुखांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

पुरूषोत्तम जाधवांचा शिवसेनेत प्रवेश, उदयनराजे भोसलेंच्या विरोधात लढवणार लोकसभा

शिवसेनेचा कोल्हापूरचा वाघ स्वगृही परत

नितेश राणेंकडून पार्थ पवारांची पाठराखण

म्हणून मोहित पाटील पिता-पुत्र भाजपच्या वाटेवर ?

शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी?

Leave a Comment