हिंदू महासभेवर बंदी घालावी तर पूजा पांडेय यांच्यावर कारवाई व्हावी- ‘युक्रांद’ची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी| ‘धिक्कार असो धिक्कार असो’ आशा घोषणा देत, उत्तरप्रदेशमध्ये हिंदू महासभेच्या पूजा पांडे यांनी केलेल्या कृत्याचा ‘युवक क्रांती दला’तर्फे आज पुणे शहरामध्ये जाहीर निदर्शने करण्यात आली. तसेच ‘हिंदू महासभा’ या संघटनेवर बंदी घालण्यात यावी आणि पूजा पांडे यांच्यावर कारवाई व्हावी. अशीही मागणी युक्रांदच्या वतीने यावेळी करण्यात आली.

महात्मा गांधी पुण्यतिथी दिवशी अलिगढ येथे हिंदू महा सभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पूजा पांडेय आणि महासभेच्या इतर कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिकृतीवर नकलीबंदुकीने गोळ्या घातल्या, व तसेच मिठाईही वाटण्यात आली. या घटनेचा भारतभरातून निषेध व्यक्त होत आहे.

‘बापू के कातीलो, गेट वेल सून, गेट वेल सून’, ‘बापू हम शर्मीन्दा है नफरात अभि जिंदा है’ अशा घोषणा युवक क्रांती दल आणि समविचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज गुड लक चौक येथे एकत्र येऊन घोषणा दिल्या.

प्रसंगी युक्रांदचे कार्यवाह संदीप बर्वे म्हणाले,”मोदी सरकारने पूजा पांडे व हिंदू महासभेवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा युक्रांद अधिक व्यापक आणि तीव्र आंदोलन करेन”

पुणे जागरूक समितीचे दिलीपसिंग विश्वकर्मा, सर्वोदयी नेते जयवंत मठकर, राष्ट्र सेवा दलाचे विलास किरोते, काँग्रेसचे नेते गोपाळ तिवारी, सोशालीष्ट पार्टीचे संतोष म्हस्के, राष्ट्रवादीचे प्रमोद राणा, अंनिसचे श्रीपाल ललवाणी, जेडीयु धर्मनिरपेक्षचे सयाजी शिंदे, युक्रांदचे सचिन पांडुळे, सुदर्शन चखाले, अतुल पोटफोडे, कमलाकर शेटे, ओंकार आमटे उपस्थित होते.

“७१ वर्षानंतरसुद्धा यांना राष्ट्पिता महात्मा गांधींच्या प्रतिकृतीवरती बुद्धी होते, हेच मुळी त्यांच्या विचारांचा प्रभाव झाल्याचे लक्षण आहे. काल अलिगढ येथे केलेल्या घटनेने त्यांनी हे मान्यच केले, की ते ७१ वर्षांपूर्वी गांधींना मारू शकले नाही. या मनोविकृतीचा निषेध करण्या ऐवजी यांची दया करावीशी वाटते, कारण ज्याने या जगाला शांततेच्या मार्गाने लढण्याचा क्रांतीकारी मार्ग दिला. त्याचे आम्ही वारस आहोत. यांना जेलची नसून तर मनोरुग्णालयाची आवश्यकता आहे. अशी मी युक्रांदतर्फे मागणी करतो.” असे युक्रांदचे राज्यसंघटक जांबुवंत मनोहर यावेळी म्हणाले.

इतर महत्वाचे –

महात्मा गांधीजींच्या शोधात

महात्मा गांधी – एक पत्रकार

महात्मा गांधी – एक आदर्श वकील

1 thought on “हिंदू महासभेवर बंदी घालावी तर पूजा पांडेय यांच्यावर कारवाई व्हावी- ‘युक्रांद’ची मागणी”

Leave a Comment