Maharashtra Lok Poll Survey : महाविकास आघाडी 150 पार, भाजपची झोप उडवणारा सर्वे पहाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून जागावाटप आणि अन्य मुद्द्यांवर सर्वांच्याच चर्चा सुरु आहेत. महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरुद्ध भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची महायुती (Mahayuti) असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. लोकसभेतील यशानंतर आता विधानसभा निवडणुकीतीही आम्हाला यश मिळेल असा विश्वास महाविकास आघाडीला आहे, तर लोकसभेतील चूक पुन्हा होणार नाही असं म्हणत महायुती विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाली असून जनतेला आकर्षित करण्यासाठी सरकार कडून वेगवेगळ्या योजना सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र असं असलं तरी एका सर्वेंने महायुती सरकारची अक्षरशः झोप उडवली आहे. या सर्व्हेत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची थेट सत्ता येईल असं म्हंटले आहे.

लोक पोलच्या सर्वेक्षणाच्या (Maharashtra Lok Poll Survey) निष्कर्षातून असं समोर आलंय की, महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महायुतीला 115 ते 128 जागा मिळू शकतात, तर त्यांची मतं 38-41 टक्के असू शकतात. तर दुसरीकडे महाविकास आघाडी पुन्हा एकदा मुसंडी मारेल असं या सर्वेक्षणात बोललं जातंय. यंदाच्या विधानसभेत महाविकास आघाडीला 141-154 जागा मिळू शकतात, तर त्यांची मतं 41- 44 टक्के असू शकतात असेही लोक पोलच्या सर्वेक्षणात म्हंटल जातंय . तर इतर जे काही पक्ष आहेत त्यांना पाच ते 18 जागा मिळू शकतात. महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

कोणत्या झोन मध्ये किती जागा?

फडणवीसांचे होम पीच असलेल्या विदर्भात भाजपला मोठा फटका बसू शकतो. विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत. त्याठिकाणी महाविकास आघाडीला 40-45 जागांवर यश मिळेल तर महायुतीला अवघ्या 15 ते 20 जागांवर समाधान मानावे लागेल.

उत्तर महाराष्ट्रात मात्र महविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीनाही समसमान यश मिळण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात 47 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी महाविकास आघाडीला 20-25 आणि महायुतीला सुद्धा 20-25 जागा जिंकता येतील.

ठाणे आणि कोकणात मात्र महाविकास आघाडीला मोठा फटका बसेल असं या सर्वेक्षणात म्हंटल आहे. या भागात विधानसभेच्या 39 जागा आहेत. यात महाविकास आघाडीला अवघ्या ५ ते १० जागा जिंकता येतील तर महायुतीला 25-30 जागा मिळू शकतात. लोकसभेला सुद्धा याच झोन मध्ये महायुतीला दमदार यश मिळालं होते.

मुंबईमध्ये मात्र महाविकास आघाडीची सरशी पाहायला मिळेल. मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. यामध्ये महाविकास आघाडीला 20 ते 25 तर महायुतीला 10 ते 15 जागा जिंकता येतील. उद्धव ठाकरेंच्या या बालेकिल्ल्यात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसची एकमेकांना साथ राहील आणि निकालात हे स्पष्ट होईल असं म्हंटल जातंय.

यानंतर पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीचा बोलबाला पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्ट्रात एकूण 58 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी महाविकास आघाडीला 30 ते 35 आणि महायुतीला 20 ते 25 जागा मिळतील .