Maharashtra Metro News : राज्यातील ‘या’ शहरात डिसेंबर पर्यंत सुरु होणार नवा मेट्रोमार्ग, कसा असेल रूट ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra Metro News : महाराष्ट्रात सध्या मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये मेट्रो धावत आहे. मेट्रोचा शहरांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत समावेश झाल्यामुळे शहरातील वाहतुकीच्या समस्येवर बऱ्यापैकी सुरळीतपणे यायला मदत झाली आहे. मात्र आता राज्यातील आणखी एक शहराला मेट्रोची भेट मिळणार आहे. चला जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती.

ठाणेकरांसाठी एक दिलासादायक आणि विकासदर्शी बातमी समोर आली आहे. डिसेंबर 2025 पासून ठाणे शहरात मेट्रो सेवा (Maharashtra Metro News) सुरू होणार आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरनंतर आता ठाणे हे राज्यातील चौथे मेट्रो शहर होणार आहे. वाढत्या वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आणि प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सोय देण्यासाठी मेट्रो 4 (वडाळा ते कासारवडवली) आणि मेट्रो 4A (कासारवडवली ते गायमुख) या दोन मार्गांवर हा प्रकल्प साकारला जात आहे. सध्या या मार्गांवर चाचणीसाठी तयारी सुरू असून ऑगस्ट 2025 मध्ये चाचणी होण्याची शक्यता आहे. चाचण्या यशस्वी झाल्यास डिसेंबरपासून कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन हा पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला होईल.

या मेट्रो प्रकल्पाची एकूण लांबी अंदाजे 35 किमी असून एकूण 32 स्थानकांचा समावेश आहे. टप्प्याटप्प्याने ही सेवा पुढे विस्तारली जाणार आहे. 2026 मध्ये दुसरा टप्पा – कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर – सुरू होईल आणि 2027 मध्ये वडाळा हा अखेरचा टप्पा नागरिकांसाठी खुला (Maharashtra Metro News) केला जाईल. या प्रकल्पामुळे ठाणे शहराच्या वाहतूक व्यवस्था क्रांतिकारक बदल अनुभवणार आहे. मेट्रोमुळे वेळेची बचत होणार असून नागरिकांना ट्रॅफिक आणि प्रदूषणापासूनही दिलासा मिळेल.

रोहित, विराटनंतर ‘या’ बड्या अष्टपैलुचा क्रिकेटला रामराम

या सेवेमुळे ठाणे शहराचा सर्वांगीण विकास होण्यास चालना मिळणार आहे. मेट्रो स्थानकांच्या आसपासची रिअल इस्टेट वाढेल, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक कोचेस, जलद सेवा, आणि सुटसुटीत इंटरचेंज सुविधाही पुरवण्यात येणार आहेत. एकूणच, ठाणेकरांसाठी ही मेट्रो सेवा केवळ प्रवासाचा नवकल्पना नाही, तर एक नवे युग सुरू करणारा टर्निंग पॉइंट ठरणार आहे.