“…तर सरकार पायउतार व्हायला तयार” गुलाबराव पाटलांचे मोठे वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नंदुरबार : हॅलो महाराष्ट्र – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदूरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध विकास कामांचं लोकार्पण केलं. दरम्यान, शिंदे गटाच्या काही नेत्यांची भाषणं पार पडली. या भाषणातून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारने जर ठाकरे सरकारच्या तुलनेत पाचपट अधिक कामं केली नसतील, तर हे सरकार पायउतार व्हायला तयार आहे, असं विधान गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) यावेळी केले.

तसेच सर्वसाधारण माणसात फिरणारे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांची प्रतिमा आहे. याचं मूळ कारण म्हणजे सोन्याचा चमच्या घेतलेल्या माणसाच्या घरी आम्ही जन्माला आलो नाही, अशी टीका गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली. शिंदे गटातील आमदार नाराज असून यातील 22 आमदार आमच्या संपर्कात आहे, असा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही गुलाबराव पाटलांनी निशाणा साधला.

मागील महाविकास आघाडी सरकारचे अडीच वर्षे आणि आमचे 90 दिवस याचा विरोधकांनी हिशोब लावावा. तुमच्यापेक्षा पाचपट कामं जर या सरकारने केली नसतील, तर हे सरकार पायउतार व्हायला तयार आहे, असे आव्हान यावेळी गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) विरोधकांना दिले. एकनाथ शिंदे रिक्षा चालवायचे. गुलाबराव पाटील टपरी चालवायचा. असे सर्वसाधारण रिक्षावाले, टपरीवाले, बँडवाले यांचं हे पथक असलेलं सरकार आहे. सामान्य माणसाला काय लागतं हे जाणणारं हे सरकार आहे. असेदेखील ते यावेळी म्हणाले.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय