Maharashtra New Railway Line : महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून सुरु होणार नवीन रेल्वेलाईन; अजित पवारांची माहिती

Maharashtra New Railway Line
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra New Railway Line। आपल्या भारतात रेल्वेचं प्रचंड मोठं जाळं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून रेल्वे धावते. महाराष्ट्रातही मागील काही वर्षात रेल्वेचा मोठा विस्तार झाला आहे. खास करून मराठवाड्यात रेल्वे मार्गांची संख्या वाढत आहे. आता मराठवाड्यातील प्रवाशांसाठी आणखी एक गुडन्यूज आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून, येत्या 17 सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर या मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या रेल्वे मार्गामुळे अनेक वर्षापासूनचे बीडकरांचे रेल्वेचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

कसा आहे बीड- अहिल्यानगर रेल्वेमार्ग – Maharashtra New Railway Line

बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्गाची एकूण लांबी 261.25 किलोमीटर आहे. यादरम्यान, रेल्वे खालील एकूण पुलांची संख्या १३०, तर रेल्वे वरील पुलांची संख्या ६५ असेल. तसेच ६५ मोठे पूल आणि ३०२ छोट्या पूलांचाही समावेश असेल. बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्गासाठी १८२२.१६८ हेक्टर जमिनीचे भूसंपादन केलं जाणार आहे. द्वितीय प्रशासकीय मान्यतेनुसार या रेल्वे प्रकल्पाची एकूण किंमत ४८०५.१७ कोटी आहे. त्यामध्ये केंद्र सरकार 50 टक्के आणि राज्य सरकार 50 टक्के हिस्सा उचलणार आहे. बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरु झाल्यानंतर मराठवाड्यातील कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होण्यास मदत होईल. (Maharashtra New Railway Line)

याशिवाय बीड ते परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे प्रलंबित प्रकरणे बीड जिल्हा प्रशासनाने तातडीने निकाली काढून आवश्यक जमीन उपलब्ध करून द्यावी. या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाच्या हिस्स्याची रक्कम तातडीने अदा करण्यात यावी. अर्थसंकल्पात मंजूर १५० कोटी रुपये देण्यात यावे. उर्वरित १५० कोटी रुपयांची तरतूद करावी. रेल्वेने आतापर्यंत दिलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी असे आदेशही अजित पवारांनी दिलेत. या बैठकीत, अजितदादांनी फलटण ते लोणंद रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्यास आणि बारामती रेल्वे स्थानकाचे काम गतीने करून ते लवकरच प्रवाशांसाठी सुसज्ज करण्याचे निर्देशही दिले.