देवेंद्र फडणवीस ‘घरची धुणी रस्त्यावर धूत नाहीत’ हे खरंय! खडसेंचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । भाजपा जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांचा ड्राय क्लिनर उल्लेख केला होता. खडसेंच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही असं उत्तर शुक्रवारी दिलं. यानंतर आता एकनाथ खडसे यांनी पुन्हा फडणवीसांनावर पलटवार करत ते ‘घरची धुणी रस्त्यावर धूत नाहीत’ असा टोला लगावला. याशिवाय आपण सोडून फडणवीस सर्वांना क्लीन चीट देत असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“देवेंद्र फडणवीस घरची धुणी रस्त्यावर धूत नाहीत हे खरं आहे. ते ड्राय क्लिन करतात. आला की क्लिन चीट देत असतात. पण नाथाभाऊ आला की घरी..हा त्यांचा स्वभाव असल्याने त्यांचं म्हणणं खरं आहे. पण मला पर्याय काय आहे. मी जर तुमच्यासमोर चार वर्ष झालं म्हणणं मांडतो आहे, तर मग तुम्हाला कधीच चर्चा करावशी का वाटली नाही ? माझी नेहमीच त्यासाठी तयारी राहिली आहे,” असं एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं.

“गैरसमज मी नाही तर देवेंद्र फडणवीस पसरवत आहेत. देवेंद्र फडणवीस सांगत आहेत की, एमआयडीसीची जमीन विकत घेतल्यानंतर माझा राजीनामा घेतला. मुळात एक इंचही जमीन मी खरेदी केलेली नाही. जी जमीन खरेदी केली ती माझ्या बायकोने आणि जावयाने केली आहे. सातबऱ्यावर आजही मूळ मालकाचं नाव आहे. बायकोने जमीन खरेदी केलेली असताना फडणवीस खडसेंनी विकत घेतली सांगत आहेl. माझा दुरान्वये याच्याशी संबंध नव्हता. हाच असा गैरसमज घेऊन काहीतरी कारण पाहिजे म्हणून चौकशी, रिपोर्ट वैगेरे झाले. विनाकारण मला बदनामी सहन करावी लागली,” अशी खंत खडसेंनी व्यक्त केली आहे.

“गेली ४ वर्ष झाले महाराष्ट्राच्या विधानसभेत माझी भूमिका स्पष्ट करत आलो आहे. मी कोणता घोटाळा केला हे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगावं यासाठी मी आग्रह केला. माझ्या शेवटच्या भाषणातही गंभीर आरोप घेऊन मला बाहेर जायचं नाही असं सांगितलं होतं. पण देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिलं नाही. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडेही सातत्याने मागणी केली. चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुरावे सादर केले. मग जर पक्षाच्या समोर जाऊनही न्याय मिळत नसेल तर जनतेच्या दरबारात जाऊन मांडण्यात गैर काय?,” अशी विचारणा एकनाथ खडसेंनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment