जपान हून आलेल्या पंढरपुरातील दोन वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | पंढरपूर शहर व तालुका कोरोनामुक्त झालेला असतानाच आज पुन्हा जपान हून आलेल्या एका  दोन वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ऐन आषाढी वारीच्या तोंडावर पंढरपुरात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे.

प्रशासनाने तातडीने शहरातील घनःशाम सोसायटीचा भाग सील केला आहे. य़ेथील एक दांम्पत्य नोकरीच्या निमित्ताने  जपान मधील  टोकियो शहरात स्थायिक झालेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते आपल्या दोन वर्षाच्या मुलाल घेवून भारत आले होते. ते मुळचे पंढरपूरचे असल्याने त्यांना सोलापुरात क्वारंटाईन केले होते. त्याचवेळी आई,वडील आणि त्यांच्या दोन वर्षाच्या मुलाचे स्वॅब घेतले होते. तपासणीमध्ये दोन वर्षाचा मुलगा कोरोना पाॅझीटीव्ह तर आई वडीलाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.

संबंधीत कोरोना बाधीत मुलावर वाखरी येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत.  कोरोना बाधीत मुलाच्या संपर्कात आलेल्या चार व्यक्तींना  अति जोखमी खाली क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Leave a Comment