अन..९३ वर्षांच्या गणपतराव देशमुखांनी घेतली भर पावसात सभा; उत्साह पाहून तरुण सुद्धा अवाक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । सांगोल्यात शेकापचा पराभव झाल्यानंतर खडबुडून जागे झालेल्या माजी आमदार गणपतराव देशमुखांनी पुन्हा कंबर कसली आहे. सांगोला तालुक्यातील महूद गावात देशमुखांनी भर पावसात सभा घेऊन आपण जनतेची बांधील आहोत हे दाखवून दिले आहे.

महूद येथे शेकापच्या शाखा उदघाटन कार्यक्रमास काल सायंकाळी माजी आमदार गणपतराव देशमुख आले होते. कार्यक्रम सुरू असतानाच अचानक पावसाला सुरवात झाली. परंतु कार्यक्रमात सुरू असलेले भाषण न थांबवता ९३ वर्षे वय असलेल्या गणपतराव देशमुखांनी भर पावसात सभा घेतली. त्याच्या पावसातील सभेची परिसरात चर्चा सुरू आहे.

इच्छाशक्तीला वय नसते असे म्हणतात. ९३ वर्षाचे गणपतराव देशमुख यांचा उत्साह देखील या वयात तरुणाईला लाजवणारा आहे. ते गेली ५५ वर्षे सांगोल्याचे आमदार म्हणून काम करत होते. गणपतराव देशमुख यांनी सांगोल्याच्या विकासासाठी अनेक आंदोलन केली आहेत. तिसंगी तलावात पाणी सोडण्याच्या आंदोलनात ही सहभागी झाले होते.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment