कोरोनातून बर्‍या झालेल्या पोलीस कर्मचार्‍याचा अपघातात मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी | देशात सर्वत्र कोरोना संकटकाळात अग्रभागी लढणाऱ्या योद्ध्यांमध्ये पोलीस महत्वाची भूमिका बजावत आहेत. महाराष्ट्रात ही पोलीस बांधव मोठ्या प्रमाणात आपले कर्तव्य बजावत आहेत. यामध्ये अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचे देखील आढळून आले आहे. यामध्ये काही पोलिसांचा मृत्यूही झाला आहे. मात्र कोरोना संकटातून वाचलेल्या एका पोलिसाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे.

मोटारीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरघाव वेगातील मोटार विजेच्या खांबावर धडकल्याने हा अपघात झाला आहे.  माधव संपत शिरसाठ असे या पोलीसाचे नाव आहे. त्यांचे वय २८ वर्षे इतके होते. कोरोनावर उपचार घेऊन ते नुकतेच रुग्णालयातून बाहेर आले होते. या अपघातात या पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे तर इतर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द या गावात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे त्यांचे कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहेत तर परिसरातून हळहळ व्यक्त होते आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment