सोलापूरच्या महापौरांना कोरोनाची लागण 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर । राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. सोलापूर जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. आता सोलापूरच्या महापौर आणि त्यांच्या पतीलाही कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. या दोघा पती पत्नीवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही माहिती समजताच जिल्ह्यात गोंधळ उडाला आहे. सोलापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांमध्ये आणखी ४० रुग्ण वाढले आहेत. अशातच या पती पत्नींना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यावर यंत्रणेत गोंधळ उडाला आहे.

ही माहिती समजताच प्रशासनाकडून महापौरांच्या निवासस्थानी सॅनिटेशन करण्यात आले आहे. रेल्वे लाइन्समधील महापौरांचे घर आणि परिसर सॅनिटाईझ करण्यात आला आहे. महापौरांना अंगदुखीसह अशक्तपणा जाणवत होता. ही लक्षणे दिसताच त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. आणि त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर त्यांचे अहवाल सकारात्मक आले. यानंतर त्यांच्या कुटुंबातील नऊ सदस्यांचीही तपासणी करण्यात आली.

महापौर आणि त्यांचे पती सोडता, कुटुंबातील इतर सर्व सदस्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. तसेच महापौरांचे स्वीय सहायक यांचीही तपासणी केली असता त्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. तथापि महापालिकेतील तीन अधिकाऱ्याना आणि १५ कर्मचाऱ्यांना कोरोनाचे निदान झाले आहे. यासोबत तीन नगरसेवकही कोरोनाबाधित झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीतील एक-दोन अधिकाऱ्यांना कोरोनाचे निदान होते आणि त्यांच्या संपर्कातूनच महापौरांना कोरोना झाल्याचे सांगण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment