खुशखबर! गणेशोत्सवाला कोकणात एसटीने जाणाऱ्यांना ई-पासची गरज नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून प्रवाशांसाठी काही खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत. कोकणात जाण्यासाठी एसटीने प्रवास करताना ई-पासची गरज लागणार नाही. मात्र खासगी वाहनाने प्रवास करताना ई-पास अनिवार्य असणार आहे. कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना १२ तारखेपूर्वी कोकणात पोहोचावं लागणार आहे. ज्यांना १२ तारखेनंतर कोकणात जायचं आहे त्यांना स्वॅब टेस्ट करुन तो निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट प्रशासनाकडे सादर करावा लागणार आहे. त्यानंतर त्यांना परवानगी दिली जाईल. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली आहे.

याशिवाय एसटी प्रवासासाठीच्या आरक्षण प्रक्रियेला अर्थात बुकींगला मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरुवात होणार असल्याचं सांगितलं. त्याशिवाय गणेशोत्वसाठी गावाला जाणाऱ्यांकरता आता १० दिवसांचा क्वारंटाईन कालावधी असणार आहे. होम क्वारंटाईन पद्धतीनं त्यांना या नियमांचं पालन करावं लागणार आहे. दरवर्षी मोठ्या संख्येनं मुंबईतून कोकणाच्या दिशेनं जाणाऱ्यांची संख्या पाहता एसटी गाड्यांची संख्याही मोठी असते. यंदाच्या वर्षी कोरोनाचं संकट लक्षात घेता परिवहन मंडळाकडून प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी खास कोकणासाठी ३ हजार एसटी गाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याचं परब यांनी सांगितलं.

कोकणात जाणाऱ्यांसाठीचे काही नियम खालीलप्रमाणं….

१)जे चाकरमानी कोकणात जातील, त्यांना १२ ऑगस्टपर्यंत अपेक्षित स्थळी पोहचायचं आहे.
२)त्यांच्यासाठी १० दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी करण्यात आला आहे.
३)१२ तारखेनंतर जायचं झाल्यास त्यांनी मागील ४८ तासांत कोरोना चाचणी करणं गरजेचं असेल.
४)एका एसटी बसमध्ये २२ जण प्रवास करु शकतील.
5)ग्रुप बुकींग केल्यास एसटी थेट गावात जाईल. ही एसटी मध्ये कुठंही थांबणार नाही.
6 )एसटीनं जाणा-यांसाठी ई पासची गरज नाही.
७)परंतु इतर वाहनांनी जाणा-यांसाठी ई पासची गरज असणार आहे.
८)खाजगी बस वाल्यांनी एसटी भाड्यापेक्षा दीडपटच भाडे घ्यावे. त्याव्यतिरिक्त पैसे आकारल्याची तक्रार झाल्यास कारवाई केली जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment