कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; धरणाचे 6 दरवाजे उघडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणाचे 6 वक्री दरवाजे 1 फुट 9 इंचांने उघडल्याने 9200 क्युसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु झाला आहे. याशिवाय पायथा वीज गृहातून 1050 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु असून एकुण 10350 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे.

105 tmc पाणी साठवण क्षमतेच्या कोयना धरणात पावसामुळं 86.6 tmc पाणीसाठा झाला आहे. मागील आठवडाभरात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. धरणात 41391 क्युसेक्स पाण्याची आवक होत असून धरणातील पाणी नियमनासाठी दरवाजे उघडून विसर्ग करण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे.

धरण परिसरात आज सकाळी साडे १० वाजण्याच्या सुमारास 3.1 रिष्टर स्केलचा सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात चिखली गावच्या ईशान्येस 10 किमी अंतरावर होता. भूकंपाचा सौम्य धक्का आणि सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment