उघड्या गटारीत पडलेल्या गर्भवती म्हशीला जीवनदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | सांगलीच्या शंभर फुटी रोडवरील भोबे गटारीत गर्भवती म्हैस पडल्याची माहिती समजताच महापालिका अग्निशामक विभाग आणि अ‍ॅनिमल राहतने धाव घेत अथक प्रयत्न करून या म्हशीला बाहेर काढत जीवनदान दिले. आज दुपारच्या सुमारास हि घटना घडली.

अनिल दानके यांची ही म्हैस गटारीकडेचे गवत चरत असताना उघड्या गटारीत पडली. यावेळी तेथील काही नागरिकांनी ही घटना लगेच सांगली अग्निशमन विभागाला कळवली. यानंतर महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे हे आपल्या अग्निशमन जवानासह घटना घडलेल्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांनी म्हशीला वर घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले पण ती म्हैस गर्भवती असल्याने अग्निशमन विभागाला अडचन निर्माण होत होती.

यावेळी अ‍ॅनिमल राहतच्या कोस्तुभ पोळ यांना घटना कळवली. यावेळी सर्व रेस्क्यू टीमसुद्धा घटनास्थळी बचाव साहित्यासहित दाखल झाली. यावेळी क्रेनच्या साहाय्याने म्हैस गर्भवती असल्याने तिला कोणती ही इजा न करता अग्निशामक विभाग आणि अनिमल राहत यांच्या टीमने सुखरूप बाहेर काढत जीवदनदान दिले. याचे नागरिकांनी कौतुक केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment