गुड न्यूज! महाराष्ट्रातील पहिल्या करोनाग्रस्ताला डिस्चार्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात करोनाग्रस्त म्हणून नोंद झालेल्या पुण्यातील पहिल्या दोन करोनाग्रस्त रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. कोरोनाची लागण झालेल्या दाम्पत्याची करोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर पुण्यातील नायडू रुग्णालयातून त्यांना सोडण्यात आलं आहे. दुबईहून आलेल्या या दाम्पत्याला ९ मार्च रोजी नायडू रुग्णालयात आणलं होतं. त्यांची चाचणी केली असता त्यांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, दोन वेळा त्यांची टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना आज बुधवारी सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नव्या वर्षाची त्यांची सुरुवात चांगली ठरली आहे.

दुबई येथून आलेले पती-पत्नी करोना बाधित असल्याचे आढळून आले. पुण्यात आढळलेलं करोनाग्रस्त दाम्पत्य हे महाराष्ट्रातले पहिले दोन करोनाग्रस्त रुग्ण होते. ९ मार्च रोजी ते दुबईहून मुंबईत आले आणि मुंबईहून पुण्यात टॅक्सीने आले होते. ते ज्या टॅक्सीने आले त्या टॅक्सी ड्रायव्हरलाही करोनाची लागण झाली. तसेच त्यांच्या मुलीलाही करोनाची लागण झाली. त्यानंतर गेले १४ दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते.

मात्र, हे दाम्पत्य आज करोनातून खणखणीत बरं झालं आहे. त्यांची दोन वेळा करोना चाचणी निगेटीव्ह आली असून ते कोरोनामुक्त असल्याचं निदान डॉक्टरांनी जाहीर केलं. यावेळी या दाम्पत्याचे गुलाब पुष्प देऊन डॉक्टरांनी अभिनंदन केलं. रुग्णालयाबाहेर सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी बाहेर येऊ निरोप देत त्यांना रुग्णवाहिकेतून घरी पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, टॅक्सी ड्राइवर आणि आणि त्याचे मुलीच्या चाचणीचे रिपोर्ट्स यायचे बाकी आहेत. ती चाचणी निगेटीव्ह आल्यास त्यांनाही घरी पाठवण्यात येईल अशी माहिती महापौरांनी दिली आहे.

दरम्यान पुढील १४ दिवस या दाम्पत्याला स्वत:ला होम क्वॉरन्टाईन करुन घ्यावं लागणार आहे. जेणेकरुन लोकांच्या मनात भीतीचं वातावरण राहणार नाही किंवा यांना लोकांकडून कोणता त्रास होणार नाही. कोरोना मुक्त झालेल्यांना शेजारच्यांनी किंवा सोसायटीमधल्या लोकांनी विरोध केला तर पोलीस तिथे असावेत, असा आरोग्य विभागाचा प्रोटोकॉल आहे. त्यानुसार पोलीस बंदोबस्तात दाम्पत्य आपल्या घरी परतलं

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment