राज्य सरकारने मुंबईत २ किलोमीटर क्षेत्रात प्रवासाची अट केली रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोन असलेल्या ठिकाणी कडक लॉकडाऊन लागू करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार नागरिकांनी २ किमी परिसरात खेरदी करावी, अशी अट लागू करण्यात आली होती. मात्र, विरोधानंतर घरापासून २ किलोमीटर परिसरातच प्रवासमुभा देण्याबाबत फेरविचार करुन लागू करण्यात आलेली अट रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकारने शुक्रवारी ही अट रद्द करून घराजवळच खरेदी करण्याचे आवाहन केले. पोलिसांनाही त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दोन किलोमीटरच्या क्षेत्रात मुंबई पोलिसांच्या आदेशानंतर विनाकारण बाहेर पडणे शक्य होत नव्हते. कंटेन्मेंट झोन असल्याने कडक निर्बंध होते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शुक्रवारी अनेकांचा विरोध असल्याचे सांगितले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही पोलिसांच्या या कृतीबद्दल आक्षेप घेतल्यावर घराजवळच खरेदी करा, असे आवाहन मुंबई पोलीस आयुक्तांनी केले, तर २ किमीची अट रद्द केल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी, समाज माध्यमातून ‘घराजवळच खरेदी करा, व्यायामासाठी घराजवळील मोकळ्या जागेत जा, असे नवे आवाहन शुक्रवारी केले. तर मुंबईत निर्बंध लागू करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेतही २ किमी क्षेत्रात मर्यादा घालण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment