मुंबईतील वीजपुरवठा कधी सुरु होणार? ऊर्जामंत्री म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बत्ती गुल झाली. मुंबईबरोबरच ठाणे, नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. सोमवारी सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित झाला. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. ‘बेस्ट’ला वीजपुरवठा करणाऱ्या ‘टाटा पॉवर’च्या वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने यंत्रणा ‘ट्रिप’ झाली आणि त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचे ‘बेस्ट’च्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईसह उपनगरांत गेल्या १ तासापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. इतका वेळ वीज पुरवठा खंडित होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं बोललं जातंय. अचानक वीज पुरवठा ठप्प झाल्यानं लोकलसह, परीक्षांवरही परिणाम झाला आहे. या परिस्थितीवर राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘महापारेषणच्या ४०० KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट १ची देखभाल-दुरुस्ती सुरू असताना सर्व भार सर्किट २ वर होता. मात्र सर्किट २मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भागात याचा फटका बसला आहे. तो अवघ्या अर्धा-पाऊण तासांत पुन्हा सुरळीत होईल. आमचे विद्युत कर्मचारी तिथं युद्धपातळीवर काम करतायेत. व पुन्हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल,’ असं आश्वासन नितीन राऊत यांनी दिलं आहे.

लोकलसेवा ठप्प
मुंबईत अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यानं लोकल सेवेलाही फटका बसला आहे. पश्चिम रेल्वेसह मध्य रेल्वेवरही ठप्प झाली आहे. गेल्या अर्ध्या तासांपासून लोकल एकाच जागी थांबली आहे असून लोकलमध्ये प्रवासी अडकले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून पुन्हा लोकल सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. सध्या हार्बर मार्गावरील काही लोकल पुन्हा सुरू झाल्याचं, समजतंय

विद्यार्थ्यांना फटका
वीज गेल्याने अंतिम वर्ष परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. ऑनलाइन लेक्चर्स सुरू असताना अचानक वीज गेल्यानं एकच गोंधळ उडाला आहे. त्याचबरोबर, अनेक शाळांच्या परीक्षा सुरू होत्या वीज पुरवठा खंडित झाल्यानं ऑनलाइन परीक्षा देता आल्या नाहीयेत.

रुग्णालयात उपकरणं बंद पडण्याची शक्यता
मुंबईतील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णालयांना याचा फटका बसला आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर किंवा इतर तांत्रिक उपकरण बंद पडण्याची शक्यता असून जनरेटरच्या माध्यमातून रुग्णालयातील व्हेंटिलेटर सुरू करण्यात येत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment