पाचगणीत महीला नगरसेवक पाॅजिटीव्ह, नगरपालिका दोन दिवस बंद; सर्व नगरसेवक  क्वारटाईन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महाबळेश्वर | पाचगणी नगरपालीकेच्या महीला नगरसेवक पाॅजिटीव्ह आल्याने पाचगणी नगरपालीका दोन दिवस बंद ठेवत सर्व नगरसेवक नगराध्यक्षा याच्यासह मुख्याअधिकारी क्वारटाईन झाले आहेत. पाचगणी नगरपालीकेच्या सर्वसाधारण सभेला पाॅजिटीव्ह महीला नगरसेवकाने हजेरी लावली असल्याने बर्याच नगरसेवकांची पाचावर धार बसली आहे. पाचगणीत महीला नगरसेवक पाॅजिटीव्ह आल्याने खळबळ उडाली असुन नगरसेवकानमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे.

  पाचगणीत महीला नगरसेवकाचा मुलगा प्रथम पाॅजिटीव्ह आला होता त्याच्या निकटवर्तीय म्हणुन महीला नगरसेवकांचा स्वॅब तपासनीला घेतला असता पाॅजिटीव्ह आल्याचे निदान झाले . महीला नगरसेवकांनी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभेला हजेरी लावली होती तर दुपारी चार वाजता त्साची चाचणी पाॅजिटीव्ह आल्याने नगरालीकेच्या सर्वसाधारण सभेत  हजेरी असल्यामुळे सर्व नगरसेवक क्वारटाईन झाले आहेत. दरम्यान महीला नगरसेवकाच्या सानिध्यातील हाय रिस्क काॅन्टॅक्ट मधील नगरसेवकांचे स्वॅब चाचणी करीता पाठवण्यात येणार असल्याची माहीती समोर आली आहे.

    दरम्यान पाचगणीतील राधे कृष्ण मंदीर परीसर कन्टेनमेंट झोन म्हणुन घोषीत करण्यात  आला असुन. पाचगणी नगरपालीकेच निर्जुनतिकरण करण्यात आले आहे. पाचगणी नगरपालीकेकडुन पाचगणी शहरात आठ आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत. मात्र पाचगणी नगरपालीकेच्या महीला नगरसेविका अर्जेटीना टेस्टच्या मशीनद्वारे तपासणी केल्याने पाॅजिटीव्ह आल्याने नगरसेवकांनमध्ये सर्वसाधारण सभेला हजेरी असल्साने भीती निर्माण झाली आहे .

Leave a Comment