राज्य सरकार जिम, शॉपिंग मॉल पुन्हा सुरु करण्याच्या विचारात; लोकलचा निर्णय मुख्यमंत्री घेतील- राजेश टोपे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यातील जिम, शॉपिंग मॉल सुरु करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असून लोकल ट्रेन सुरु करण्याचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा असेल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिम हे जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीनं गरजेचं आहे, त्यामुळं यावर विचार केला जाईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे.

महाराष्ट्रात मिशन बिगिन अगेन अंतर्गंत अनेक उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. जास्तीत जास्त गोष्टी पुन्हा सुरु केल्या जातील असं राजेश टोपे यांनी सांगितलं. दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच आम्हालाही रेल्वेने प्रवास करण्याची मुभा द्या. एसटीची सेवा कमी पडतेय असं सांगत शेकडो संतप्त प्रवाशांनी आज नालासोपारा एसटी स्टँडमध्ये प्रवाशांनी जोरदार आंदोलन केले. त्यानंतर रेल्वे रुळांवर घुसून ठिय्या आंदोलन केलंय. या घटनेवरही राजेश टोपे यांनी भाष्य केलं आहे. लोकल सेवा सुरु करण्याची मागणी अगदीच रास्त आहे मात्र, ट्रेनमध्ये सोशल डिस्टनसिंग पाळलं जाणार नाही, त्यामुळं ट्रेन सुरु करायच्या की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असं राजेश टोपे म्हणाले.

पुण्यातही मिशन झिरो प्रकल्प राबवणार
मुंबईत राबवलेल्या मिशन झिरो प्रकल्पामुळं मुंबईतील रुग्णसंख्येत घट झाली आहे. त्यामुळं मुंबईप्रमाणेच पुण्यातही मिशन झिरो प्रकल्प राबवणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. ऍक्टिव्ह रुग्ण संख्या कमी करणे, बेडची संख्या वाढवणे, आयसोलेशन करणे, टेस्ट करणे या सगळ्या गोष्टी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सिंगल पॉइंट कॉन्टेक्ट ही प्रणाली तयार केली जाईल. जेणेकरून एका ठिकाणी सर्व माहिती मिळेल. असं ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment