सांगली जिल्ह्यात नव्याने १० जण कोरोना पॉझिटिव्ह; शिराळा तालुक्यातील मणूदर बनले हॉटस्पॉट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाड होत असून बुधवारी नव्याने 10 रुग्णांची भर पडली. यापैकी पाच जण बाधितांच्या संपर्कातील आहेत. शिराळा तालुक्यातील मणूदर हॉटस्पॉट बनला असून तेथे पुन्हा चार जण पॉझिटिव्ह आढळले. तेथील 40 वर्षांचा पुरुष, 38 वर्षीय पुरुष, 17 वर्षाचा मुलगा व 16 वर्षाच्या मुलगीचा समावेश आहे. विट्यातील कोरोना बाधिताचा अकरा वर्षाचा मुलगा व 67 वर्षीय सासरा, आटपाडी तालुक्यातील तालुक्‍यातील विठलापूर येथील 96 वर्षीय महिलेला कोरोना बाधित झाली आहे. मांगलेमध्ये बाधिताच्या संपर्कातील अकरा वर्षाचा मुलगा, तसेच पलूस तालुक्यातील कुंडल येथील 55 वर्षांचा पुरुष, कडेगाव तालुक्यातील वांगीमध्ये 69 वर्षीय वृद्ध यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाबाधित रुग्णांपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 192 रुग्ण आढळले असून उपचाराखाली 81 रुग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून सर्वाधिक रुग्ण शिराळा तालुक्यात आढळत आहेत. या भागातील बहुतांशी लोक मुंबईला नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने असतात. ते परतत असल्याने तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मात्र सर्वाधिक रुगण मणदूरमध्ये आढळत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. मणदूरमध्ये बाधितांच्या संपर्कातील पुन्हा चार जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. चाळीस वर्षांचा पुरुष, 38 वर्षीय पुरुष, 17 वर्षाचा मुलगा व 16 वर्षाच्या मुलगी हे बाधिताच्या संपर्कातील असल्याने त्यांना संस्था क्वॉरंटाईन करण्यात आले होते. काही रुग्णांना काहीसा त्रास होवू लागला होवू लागला होता. त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांचे कोरोनाच्या तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते, या चारही जणांचा अहवाल बुधवारी दुपारी आला असून बाधित असल्याचे स्पष्ट झाले.

विट्यातील बाधितचा मुलगा सासराही पॉझिटिव्ह
विट्यातील 34 वर्षीय कोरोना बाधिताचा अकरा वर्षाचा मुलगा आणि त्याच्या 67 वर्षीय सासऱ्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. त्या दोघांची तपासणी केली असता त्यांचा अहवाल ही पॉझिटिव्ह आला आहे.

विठलापूरला 96 वर्षाची आजी पॉझिटिव्ह
वाळवा तालुक्यातील कामेरी येथे 94 वर्षीय आजी कोरोना बाधित आढळली होती. उपचारानंतर त्या आजीने कोरणा वर मात केली होती. त्यानंतर आटपाडी तालुक्यातील विटलापूर येथे 96 वर्षाची आजी पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आजीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. त्यामुळे तिची तपासणी केली कोरोना चाचणीच्या अहवालानंतर आजी बाधित असल्याचे स्पष्ट झाले.

डॉक्टरच्या संपर्कातील मुलगाही बाधित
शिराळा तालुक्यातील मांगले येथे दोन दिवसांपूर्वी खासगी डॉक्टर आणि त्याचा भाऊ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. डॉक्टरच्या संपर्कातील काही लोकांना संस्था क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यापैकी अकरा वर्षाच्या मुलग्याला सर्दी, खोकला आणि ताप येऊन त्रास होऊ लागल्याने त्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्याला मिरजेतील रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले होते. त्याच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

पलूस तालुक्यातील कुंडल या गावातही बुधवारी कोरोनाने शिरकाव केला. या तालुक्यात मागील चार दिवसात नऊ रुग्ण आढळले आहेत. कुंडल येथे 55 वर्षीय व्यक्ती 23 मे रोजी रायगड येथून आली होता. येथे त्या व्यक्तीचा भाचा आहे. रायगडमधून आल्यानंतर त्या व्यक्तीला होम क्वॉरंटाईन केले होते. त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली होती, त्याबाबत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देवून त्यांना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे कोरोनाच्या तपासणीसाठी स्बॅब घेण्यात आला होता, 55 वर्षीय व्यक्तीही पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा आरोग्य विभागाकडून शोध घेण्यात येत आहे. कडेगाव तालुक्यातील वांगी येथील 69 वृद्धामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्याला मिरजेतील रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कातील व्यक्तींना क्वॉरंटाईन कक्षात दाखल केले आहे.

Leave a Comment