सातारा जिल्ह्यात 27 जण कोरोनामुक्त तर 7 जण कोरोना पोझिटीव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या  27 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले आहे. तसेच 7 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला असल्याचेही माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील 20 वर्षीय महिला, कराड तालुक्यातील चचेगाव येथील 45 वर्षीय महिला व 20 वर्षीय पुरुष, चचेगाव येथील 45 वर्षीय पुरुष, खंडोबानगर, मलकापूर येथील 8 वर्षीय बालक, 30 वर्षीय महिला, जावली तालुक्यातील रामवाडी येथील 48 व 30 वर्षीय महिला, 22 वर्षीय पुरुष व 5 वर्षाचा बालक, वाई तालुक्यातील बावधन येथील 57 वर्षीय पुरुष व 44 वर्षीय महिला, पसरणी येथील 37 वर्षीय महिला, कवठे येथील 35 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील नागठाणे येथील 53 वर्षीय पुरुष, सातारा येथील 26 वर्षीय पुरुष, वडूथ येथील 63 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील शेंडेवाडी (कुंभारगाव) 20 वर्षीय महिला, 18 वर्षीय युवक, पालेकरवाडी येथील 65वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष, फलटण रविवार पेठ येथील 45 व 27 वर्षीय महिला, 9, 6 व 4 वर्षीय बालिका व 7 वर्षाचा बालक यांचा समावेश आहे.

7 जणांचा अहवाल कोरोना बाधित
कोरोना बाधितांमध्ये सातारा तालुक्यातील चोरगेवाडी येथील 61 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील पळशी येथील 50 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 27 महिला, फलटण तालुक्यातील जाधवाडी येथील 12 वर्षीय युवती, फरंडवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील फडतरवाडी येथील 47 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील 35 वर्षीय महिला

371 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथील 14, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 52, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 53, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 20, वाई येथील 24, शिरवळ 32, रायगाव येथील 24, पानमळेवाडी येथील 39, मायणी येथील 19, महाबळेश्वर येथील 3 , दहिवडी येथील 30, खावली येथील 22 असे एकूण 371 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, असे डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

Leave a Comment