उद्धवजी पण गारद का? फडणवीसांचा शरद पवारांच्या मुलाखतीवरून टोमणा 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । शिवसेनेचे नेते आणि सामना चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची घेतलेली मॅरेथॉन मुलाखत सध्या खूप चर्चेत आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून या मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध केला होता. या मुलाखतीचा टिझर राऊत यांनी एक शरद सगळे गारद असा शीर्षकाने प्रसिद्ध केला आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना सगळे म्हणजे उद्धवजी पण गारद का? असा टोमणा मारला आहे.

“सामना दुर्दैवाने केवळ सरकार सांभाळण्याचं काम करत आहे. सामना आधी शिवसेनेचं होतं पण आता तिन्ही पक्षाचं मुखपत्र आहे,” अशी टीकाही त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस राज्यातील कोरोना स्थितीच्या आढाव्यासाठी राज्यभर दौरे करत आहेत. सध्या ते जळगाव दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा टोमणा मारला आहे. “करोनाचा सामना करत असताना आम्हाला व्हायरसचा सामना करायचा आहे. लढा व्हायरसशी आहे आहे नंबरशी नाही. सरकार सातत्याने नंबर कमी करण्यासाठी प्रयत्न करत असून ते चुकीचं आहे. टेस्टिंग आणि व्यवस्था वाढवली पाहिजे. महाराष्ट्रात टेस्टिंगची संख्या कमी आहे. करोनाला रोखण्यासाठी टेस्टिंग वाढवणं सर्वात महत्त्वाचं आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

पारनेरमधील राजकारणावरुन टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी, कोणत्या जगात ही मंडळी जगत आहेत हे माहिती नाही. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन करोनाचा सामना कसा करायचा याचा विचार केला पाहिजे. सरकारमध्ये विसंवाद असून महाराष्ट्राला याचा फटका बसत आहे अशी टीका केली. सामनामधून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “सामना दुर्दैवाने केवळ सरकार सांभाळण्याचं काम करत आहे. सामना आधी शिवसेनेचं होतं पण आता तिन्ही पक्षाचं मुखपत्र आहे. दुर्दैवाने माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वात जी तत्वं पाळली, ज्या तत्वांचा विरोध केला आज त्यांचीच पाठराखण केली जात आहे”.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment