१ जून नंतर काय? मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ३० जानेवारीला देशात पहिला कोरोना रुग्ण सापडला. मार्च मध्ये जगातील आणि देशातील रुग्णसंख्या पाहून सरकारने मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देशव्यापी संचारबंदी जाहीर केली होती. देशातील परिस्थिती बिकट होत असल्याचे लक्षात घेऊन सरकारने संचारबंदीची मुदत वाढवत नेली. आता ३१ मे पर्यंत वाढविलेली संचारबंदी १ जूनला हटवली जाणार की संचारबंदी अशीच सुरु राहणार आणि नियम शिथिल केले जाणार का? याबाबतअनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता माहिती दिली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या वेबिनार मध्ये ठाकरे यांनी याबाबत उत्तरे दिली आहेत.

महाराष्ट्रातील पुढची संचारबंदीची स्थिती काय असेल यावर ठाकरे यांनी भाष्य केले आहे. आहे त्या परिस्थितीशी मिळते जुळते घेऊन वावरायला शिका असे सांगितले आहे. तसेच “कोरोनाबरोबर जगायला शिका म्हणणे अपरिहार्य आहे. त्यामुळे संचारबंदी हा शब्द वापरणे बंद करायला हवे. कोरोनानंतरचे जग तसेही बदललेले असणार आहे. त्या जगाशी मिळते जुळते घेऊन स्वतःला बंद करून फिरा” असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आपण आपली जीवनशैली आता बदलली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक विलगीकरणाचे सर्व नियम पाळत, मास्क चा वापर करणे, सॅनिटायझर वापरणे, सतत तोंडाला हात न लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे अशा प्रकारची सर्व खबरदारी घेऊन वावरणे शिकले पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

कोरोनाचे संक्रमण भारतात सुरु झाल्यावर पुढील परिस्थितीची राज्य सरकारला कल्पना होती, त्यानुसार आरोग्याच्या सुविधा उभारण्यासाठी लष्कराचे मार्गदर्शन घेणे, ते कशा पद्धतीने तातडीने हॉस्पिटल आणि सुविधा उभ्या करतात यांची माहिती घेणे या सगळ्याच्या तयारी सुरु होत्या. पण अचानक केंद्र सरकारने संचारबंदी जाहीर केली. त्याआधीच राज्य सरकारने एक एक गोष्ट बंद करायला सुरुवात केली होती. त्यामुळे आता संचारबंदी लवकर उठवता येणार नाही. परिस्थिती बघून हळूहळू गोष्टी सुरु केल्या जातील असे उद्धव ठाकरे म्हणाले. एकूणच संचारबंदी उठणार नसली तरी हळूहळू तिचे नियम शिथिल नक्कीच शिथिल केले जातील असे त्यांनी सांगितले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment