चिंताजनक ! परभणीची रेड झोनकडे वाटचाल ; एकाच दिवसात सापडले नऊ कोरोनाग्रस्त रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

मागील चार दिवसांमध्ये सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णांमूळे परभणी जिल्ह्याची वाटचाल वेगाने रेड झोनकडे होत आहे .आज आलेल्या स्वॅब अहवालातून नऊ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्याचा कोरणा बाधित रुग्ण संख्येचा आकडा दोन अंकी संख्येवर गेलाय . त्यामुळे जिल्हा वासियांची धडधड वाढलीय .जिंतूर तालुक्यातील शेवडी गावांमध्ये एकाच दिवशी तीन जणांना कोरोना बाधा झाल्यानंतर आता सतत चौथ्या दिवशी हा आकडा वाढत चालला असून परभणी जिल्ह्यात तब्बल सोळा जण कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सोमवारी मुंबई येथून आलेली सोनपेठ तालुक्यातील शेळगाव ची महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती .त्यानंतर साकला भाग प्लॉटमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता .आज आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्यातील नवीन नऊ कोरोनाग्रस्त रुग्ण पॉझिटिव्ह निष्पन्न झाले आहेत. त्यामध्ये शेळगाव येथील महिलेच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

पूर्णा तालुक्यामध्ये आज पहिल्यांदाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे तर गंगाखेडमध्ये दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सहाजिकच जिल्हा वासियांची धडधड वाढली आहे. विशेष म्हणजे सापडलेली ही सर्व रुग्ण पुणे व मुंबई या रेड झोनमधुन आलेले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment