हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे. आणि थंडीला देखील सर्वत्र सुरुवात झालेली आहे. या महिन्यांमध्ये मुलांना देखील दिवाळीच्या सुट्ट्या असतात. त्यामुळे अनेक लोक कुटुंबासोबत बाहेर फिरायला जात असतात. कुटुंबासोबत किंवा अनेक कपल देखील फिरायला जातात. जर तुम्ही मुंबई आणि ठाण्यात राहत असाल, तर आज आम्ही तुम्हाला मुंबई ठाण्यापासून जवळ असणारी फिरण्यासाठी अत्यंत चांगले ठिकाणी सांगणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्हाला निसर्गाचा अद्भुत आनंद घेता येईल.आणि तुमचे मन देखील प्रसन्न होईल. ठाण्यापासून अगदी शंभर किलोमीटर अंतरावर असलेली काही ठिकाणी आम्ही सांगणार आहोत. तुम्ही वीकेंडला देखील या ठिकाणी फिरायला जाऊ शकता.
ठाणे हे राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांपैकी एक आहे. मुंबईपासून हे शहर अत्यंत जवळ आहे. ठाण्याला संपूर्ण चारी बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे. स्थानिक लोक याला तलावांचे शहर असे म्हणतात. कारण हे शहर सुमारे नऊ तलावांनी वेढलेले आहेत.त्यामुळे अनेक पर्यटक देखील या ठिकाणी भेट देत असतात. आज आम्ही ठाण्यापासून अत्यंत जवळ असणाऱ्या काही ठिकाणांबद्दल माहिती देणार आहोत.
माथेरान
माथेरान हे ठाण्यापासून अगदी जवळ आहे.तुम्ही जर ठाण्यापासून काही जवळच्या अंतरावर जाण्यासाठी ठिकाण शोधत असाल, तर माथेरान हे अत्यंत उत्कृष्ट ठिकाण आहे. हे अत्यंत लोकप्रिय हिल स्टेशन आहे. माथेरान अनेक जंगले, धबधबे आहेत. त्यामुळे येथील सौंदर्य पाहण्यासारखे असते. तसेच या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला घोडे किंवा टॉय ट्रेनचा आनंद घेता येतो. ठाण्यापासून सुमारे 90 किलोमीटरवर असणारे हे माथेरान निसर्गाने वेढलेले आहे. या ठिकाणी तुम्ही नक्कीच तुमची ट्रिप प्लॅन करू शकता.
कर्जत
कर्जत हे देखील महाराष्ट्रातील एक सुंदर असे पर्यटन स्थळ आहे. हे कर्जत रायगड जिल्ह्यात वसलेले आहे. कर्जत हे उल्हास नदीच्या काठावर आहे. मुंबई आणि ठाण्यामधील लोकांना विकेंडला जाण्यासाठी हे अत्यंत चांगले ठिकाण आहे. या कर्जतला निसर्गांनी वेढलेल्या आहे. यामध्ये ट्रेकिंग, रिवर राफ्टींग कॅम्पिंग देखील असते. तसेच कोथळीगड किल्ला देखील या ठिकाणी आहे. कोंढाणा लेणी, भोर घाट यासारखे अद्भुत ठिकाण तुम्हाला पाहता येईल. ठाण्यापासून हे अंतर केवळ 68 किलोमीटर एवढे आहे.
मनोरी बीच
तुम्ही जर ठाण्यापासून जवळच्या समुद्रकिनाऱ्याला भेट द्यायचा विचार करत असाल, तर मनोरी बीच हा तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. या ठिकाणचे वातावरण देखील अत्यंत शांत आहे. या ठिकाणी तुम्ही चांगला वेळ देखील घालू शकता. मनोरी बीचमध्ये तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्त या गोष्टी अत्यंत सुंदरपणे पाहू शकता. तसेच या ठिकाणी तुम्ही स्कुबा डायविंगचा अनुभव देखील घेऊ शकता. ठाण्यापासून मनोरी बीच अंतर केवळ 35 किलोमीटर एवढे आहे.