Maharashtra Police Bharti | पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे. आणि याबाबतची अर्ज प्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे. महाराष्ट्र पोलीस दल आतापर्यंत 17,471 पदांसाठी तब्बल 17,76,256 झालेल्या आहेत. कारागृह विभागात 1800 पद रिक्त होती. आणि त्यासाठी तब्बल 3 लाख 72 हजारांपेक्षा जास्त अर्ज दाखल झालेले आहे. आता ही प्रक्रिया भरती प्रक्रिया 19 जून पासून सुरू होणार आहे. याबद्दलची माहिती अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार वटकर यांनी दिलेली आहे.
राज्यामध्ये पोलीस भरतीला (Maharashtra Police Bharti ) 19 जून 2024 पासून सुरुवात होणार आहे. आणि त्यासाठी 17471 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी आत्तापर्यंत तब्बल 17 लाख 76 हजार 256 अर्ज आलेले आहेत. बॅट्समन या पदाच्या एकूण 41 रिक्त जागा आहेत आणि त्यासाठी 32 हजार 26 लोकांनी अर्ज केलेले आहेत. तुरुंग विभागातील शिपाई या पदासाठी 1800 जागा उपलब्ध असून 3 लाख 72 हजार 354 अर्ज आलेले आहेत. चालक या पदासाठी 1686 रिक्त जागा आहेत आणि त्यासाठी 1 लाख 98 हजार 300 अर्ज आलेले आहेत. पोलीस शिपाई या पदासाठी 9595 जागा आहेत आणि या जागा भरण्यासाठी तब्बल 8 लाख 22 हजार 984 अर्ज आलेले आहेत.
अर्ज केलेल्या अर्जदारांपैकी 40 टक्के उमेदवार हे उच्चशिक्षित आहेत. अशी माहिती देखील आलेली आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झालेले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे या परीक्षेदरम्यान जर पाऊस पडला तर विद्यार्थ्यांना पुढील तारीख दिली जाईल. अशी देखील माहिती समोर आलेली आहे. एका उमेदवारांना एकाच पदासाठी अर्ज करणे अपेक्षित होते. परंतु जर त्या उमेदवाराने विविध पदासाठी अर्ज केला असता, दोन्ही ठिकाणच्या मैदानी परीक्षेत एक तारीख येणार नाही. याची देखील काळजी घेतली जाणार आहे.
राज्यात यावर्षी एकूण 17471 पोलीस भरतीसाठी रिक्त पदे आहेत. त्यातच आता वाशिम जिल्ह्यातील पोलीस दलामध्ये 68 रिक्त जागा आहेत. आणि त्यासाठी 4178 अर्ज आलेले आहेत. त्यामुळे आता पोलीस मुख्यालय येथील प्रांगणामध्ये पोलीस शिपाई भरतीसाठीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी 50 अधिकारी आणि अडीचशे कर्मचारी उपस्थित राहणार आहे. 15 जून रोजी या ठिकाणची मैदानी परीक्षा चालू होणार आहे. त्यासाठी एकूण 1000 उमेदवार असणार आहे. परंतु जर पावसामुळे त्यांची मैदानी चाचणी होऊ शकली नाही, तर त्यांना पुढील तारीख देण्यात येणार आहे.