Maharashtra Police Recruitment | अत्यंत महत्त्वाचे!! पोलीस भरतीसाठी ही महत्त्वाची अट लागू; दुर्लक्ष केल्यास होईल नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra Police Recruitment | जे विद्यार्थी गेल्या अनेक दिवसापासून पोलीस भरतीची वाट पाहत होते. त्या विद्यार्थ्यांसाठी आता राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. महाराष्ट्रात पोलीस दलात 17 हजार 471 पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या भरतीची प्रक्रिया 5 मार्चपासून सुरू झाली होती.

आता महाराष्ट्र दिल्या पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment) प्रक्रियेत एक नवीन नियम आणलेला आहे. हा नियम उमेदवारांसाठी एक मोठी अडचण ठरणार आहे. पोलीस भरतीसाठी आता एका जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार आहे. अनेक उमेदवारांनी वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी अर्ज भरले होते. परंतु हा प्रकार पोलीस प्रशासनाच्या लक्षात येताच गृह विभागाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

का घेतला निर्णय ?

पोलीस भरतीला सुरुवात झालेली असली, तरी या प्रक्रियेत वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी उमेदवारांनी अर्ज केलेले होते. परंतु त्यांना केवळ एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे. आणि त्यासाठी त्यांना हमी पत्र देखील द्यावे लागणार आहे. वेगववेगळ्या ठिकाणी अर्ज केल्यामुळे भरती प्रक्रियेनंतर काही जागा रिक्त राहतात. कारण एका उमेदवाराची दोन जिल्ह्यात निवड झाल्यास, तो सोयीचा जिल्हा निवडतो. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातील जागा रिक्त राहते. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. ही बाब लक्षात घेता आता एका जिल्ह्यातून भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची ही अट करण्यात आलेली आहे.

आता 17 मे पर्यंत द्यावा लागणार अर्ज | Maharashtra Police Recruitment

जाऊ उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज केलेले आहेत. त्यांना हमीपत्र द्यावे लागणार आहे. कारण आता एकापेक्षा जास्त जिल्ह्यात केलेले अर्ज हे नियमबाह्य ठरणार आहे. याबाबतची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांनी दिलेली आहे. त्यामुळे पोलीस कार्यालयात 17 मे 2024 पर्यंत हे हमीपत्र दाखल करायचे आहे. उमेदवाराला हमीपत्रात कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे. याचा देखील तपशील द्यावा लागणार आहे की, त्याने किती अर्ज केलेले आहेत आणि कुठे कुठे केलेले आहेत याची सगळी माहिती द्यावी लागणार आहे आणि एका पदासाठी केवळ एका अर्जाला प्राधान्य देण्यास हमी त्यास द्यावी लागणार आहे.