Maharashtra Prisons Department Bharti 2024 | जे विद्यार्थी पोलीस भरतीची मागील अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता परभणी पोलीस विभागाअंतर्गत शिपाई पोलीस (Maharashtra Prisons Department Bharti 2024) या पदाच्या तब्बल 513 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार आणि पात्रतेनुसार उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ही अर्ज प्रक्रिया 5 मार्च 2024 रोजी सुरू होईल. त्याचप्रमाणे 31 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ही परीक्षा पद्धत आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे याची सविस्तर माहिती आता आपण घेऊया.
महत्वाची माहिती
- पदाचे नाव – पोलीस शिपाई आणि चालक
- पदसंख्या- 513 जागा
- शैक्षणिक पात्रता- बारावी पास
- नोकरीच्या ठिकाणी -परभणी
- वयोमर्यादा
- खुलागट 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय 18 ते 33 वर्ष
- अर्जशुल्क
- खुलावर्ग 450 रुपये, मागासवर्ग 350 रुपये
- अर्जा पद्धती – ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 5 मार्च 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2024.
ऑनलाइन अर्ज कसा करायचा
- या पोलीस भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जामध्ये जर काही माहिती अपूर्ण असेल तर ते अर्ज पात्र ठरणार नाहीत.
- या अर्जासोबत आवश्यक असणारे कागदपत्र तुम्हाला अपलोड करायची आहेत.
- शेवटच्या तारखेआधी हे अर्ज करायचे आहे अन्यथा तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
निवड प्रक्रिया | Maharashtra Prisons Department Bharti 2024
- शारीरिक चाचणी
- लेखी परीक्षा
- चारित्र प्रमाणपत्राचे पडताळणी
- वैद्यकीय चाचणी