Maharashtra Rain Alert : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार; हवामान विभागाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मान्सून दाखल झाला असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. इथून पुढे २४ तास अतिशय महत्वाचे असून दक्षिण कोकण, उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात आज तर, उद्या कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (Maharashtra Rain Alert) वर्तवली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये.

कोणकोणत्या जिल्ह्याना पावसाचा इशारा – Maharashtra Rain Alert

पुढील काही तासांमध्ये मुंबईसह उपनगर, पालघर, अहमदनगर, नाशिक, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याची (Maharashtra Rain Alert) शक्यता आहे. या एकूण परिस्थितीत नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पालघर, अहमदनगर, नाशिक, सोलापूर सांगली छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाची शक्यता आहे. रायगड आणि ठाण्यात सुद्धा अशाच प्रकारे पाऊस कोसळण्याची (Maharashtra Rain Alert) शक्यता आहे. कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या सर्व जिल्हयांना येलो अलर्ट देण्यात आलाय. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि तुरळक क्षेत्रात अति मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे या भागात रेड अलर्ट देण्यात आलाय.