Maharashtra Rain Updates : पुढील 2 दिवस कोसळधार; तुमच्या जिल्ह्यांत काय परिस्थिती?

Maharashtra Rain Updates 22 may
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Rain Updates । मुंबई, पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यात अनेक भागांत बुधवारी रात्री पाऊस झाला. गुरुवारी सकाळीसुद्धा पावसाळी रिमझिम अशीच सुरु असून पुढील २ दिवसातही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. २५ मे पर्यंत कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ४०-५० किमी प्रतितास वेगाने वादळे, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात ते व्यापक हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पुणे शहराला 2 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट- Maharashtra Rain Updates

त्यानुसार, पुढील दोन दिवसांमध्ये दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाच्या सऱ्या बरसत आहेत. पुणे शहराला पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये “विजांसह जोरदार वारे (४०-५० किमी प्रतितास) आणि मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर आणि सातारा येथील घाट विभागांसाठी सुद्धा इशारा जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये काही ठिकाणी ५०-६० किमी प्रतितास वेगाने गडगडाट, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. Maharashtra Rain Updates

महाराष्ट्र आणि गोव्या जवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. यावर्षी मान्सून अंदामान-निकोबारमध्ये लवकर सक्रीय झाला आहे. महाराष्ट्रात जूनच्या सुरुवातीलाच प्री-मान्सून दिसतो. पण यावर्षी वातावरणातील बदलांमुळे प्री-मान्सून पावसाला लवकर सुरुवात झाली आहे.