Maharashtra Rain Updates : सावधान!! आजपासून पावसाचा जोर वाढणार; या 26 जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Rain Updates
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Rain Updates । ४ दिवसाच्या विश्रांतीवर आजपासून पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यानुसार हवामान विभागाने काही जिल्ह्याना येलो अलर्ट दिला आहे. तसेच नागरिकांना आणि प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. कोणकोणत्या जिल्ह्याला पावसाचा तडाखा बसू शकतो? तुमचा जिल्हा यात आहे का ते आज आपण पाहुयात.

कोणकोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट – Maharashtra Rain Updates

पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वादळी पावसाचा (Maharashtra Rain Updates) इशारा हवामान विभागानं दिला आहे. हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील 26 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये नागपूर, वर्धा , चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा , बीड, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर , धाराशिव, जळगाव, धुळे नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी , ठाणे आणि पुण्याचा समावेश आहे. या जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. तसेच यंत्रणाही अलर्ट मोड वर आहेत.

हवामान विभागाने मुंबईत मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, पुण्यासह सोलापूरात आणि राजच्याच्या घाट क्षेत्रामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात बरसेल. उत्तर महाराष्ट्रात नाशिकला आणि अहिल्यानगरला वादळी पावसाचा तडाखा बसू शकतो. जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकणातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30 ते 40 किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार, कोकणातील रायगड, रत्नागिरीमध्ये हलक्या स्वरूपात पावसाच्या सऱ्या कोसळतील (Maharashtra Rain Updates) . विदर्भातील नागपूर, वर्धा , चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळेल. गोंदिया, भंडारा, नंदुरबार, लातूर भागात मात्र हवामान कोरडं राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे, त्यामुळे इथल्या नागरिकांना पावसाचा कोणताही फटका बसणार नाही.