हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Rain Updates । मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्रात चांगलाच जोर धरला आहे. हवामान विभागाने आज कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट दिला आहे. या भागात मुसळधार पावसासह वादळी वारे वाहण्याची ही शक्यता आहे. तळ कोकणापासून ते मुंबई पालघर पर्यंत किनारपट्टी असणाऱ्या भागात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे तर उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी येलो अलर्ट आहे.
रायगड- रत्नागिरीला पावसाचा इशारा – Maharashtra Rain Updates
भारतीय हवामान खात्याने (IMD) रायगड, रत्नागिरी आणि पुण्यातील घाटमाथ्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अलर्टमध्ये मुसळधार पाऊस (Maharashtra Rain Updates) आणि वादळी वाऱ्यांमुळे संभाव्य व्यत्यय येण्याची शक्यता आहे. या प्रदेशातील रहिवाशांना आणि प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचा आणि अपडेट्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पुढील दोन दिवसात विदर्भ मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. तर मुंबई महानगर प्रदेशातील अनेक भाग, नाशिक घाट क्षेत्र, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरच्या डोंगराळ भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, मराठवाड्यात, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये सुद्धा नागरिकाने सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या भागातही आज मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, विदर्भात, नागपूर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता (Rain Updates) वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याच्या सध्याच्या अंदाजावर लक्ष ठेवा असा इशारा हवामान विभागानं दिला आहे .