हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Rain Updates। महाराष्ट्रात पावसाचा जोर आजही कायम पाहायला मिळतोय. आज राज्यात अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील 24 ते 48 तासांमध्ये राज्याच्या कोकण भागासह मुंबई शहर आणि उपनगरांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरात मंगळवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मान्सून १२ दिवस आधी दाखल झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. मुंबईसह अनेक शहरात सखल भागात पाणी साचल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडा पडला आहे.
कोणत्या जिल्ह्याना कोणता अलर्ट – Maharashtra Rain Updates
महाराष्ट्रात आज 27 मे रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्हा तसेच साताऱ्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. रायगड, पुण्यातील काही भाग, सातारा, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, गडचिरोली, या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत पहाटेपासून पाऊस सुरु झाला आहे, हवामान विभागाने मुंबई ठाणे भागात पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुढील पाच दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ आहे.
नैऋत्य मोसमी पाऊस आज 26 मे रोजी. मुंबई, पुणे, शोलापूर, काळबुर्गी, महबूबनगर, कवळी, पोहोचला आहे#IMD #WeatherUpdate #mausam #rainfall #mumbairain #thunderstorm pic.twitter.com/ebTyBdWAEt
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 26, 2025
यंदा मान्सूनची लवकर एंट्री –
दरम्यान, यंदा मान्सूनने ५५ वर्षांचा रेकॉर्ड तोडत 16 दिवस आधीच मुंबईत आगमन केलं आहे. यापूर्वी 1956, 1962 आणि 1971 मध्ये 29 मे रोजी मान्सून मुंबईत दाखल झाला होता. मात्र, यंदा पहिल्यांदाच मान्सूनने मुंबईत लवकर एंट्री केली आहे.मान्सूनची आतापर्यंतची वाटचाल पाहता पुढील तीन ते पाच दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून घेईल (Maharashtra Rain Updates) अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिली आहे.




