Maharashtra Unlock : 7 जूनपासून महाराष्ट्र अनलॉक, पहा कोणत्या जिल्ह्यात काय सुरु काय बंद, इत्यंभूत माहिती एका क्लिक वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यामध्ये कोरोना संदर्भात आता दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे. दररोज बाधित होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तर करुणा मुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना आकडेवारीवरून दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. या प्रक्रियेनुसार राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री नियमावली जाहीर केली असून ती सोमवारी सात जून पासून लागू होणार आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात येणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती समोर आली आहे. रुग्ण संख्या आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यानुसार राज्यातील जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात येणार आहे. अनलॉकची प्रक्रिया ही पाच लेव्हल मधले केली जाणार आहे या बद्दल ची संपूर्ण माहिती घेऊयात…

अनलॉक च्या पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये पाच जिल्हे, तिसऱ्या टप्प्यामध्ये दहा जिल्हे आणि चौथा टप्प्यांमध्ये दोन जिल्हे असणार आहेत.

अनलॉक लेव्हल आणि जिल्हे

*पहिली लेव्हल — औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ. या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्‍क्‍यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.

*दुसरी लेव्हल— अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर आणि नंदुरबार. पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के ऑक्सिजन बेड 25 ते 40 टक्के दरम्यान व्यापलेले असावेत.

*तिसरी लेव्हल — अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद आणि कोल्हापूर. पॉझिटिव्हिटी रेट पाच ते दहा टक्के असावा ऑक्सीजन बेड हे 40 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील.

*चौथी लेव्हल — पुणे आणि रायगड. पॉझिटिव्हिटी रेट 10 ते 20% असेल तसंच इथं ऑक्सीजन बेड 60 टक्‍क्‍यांच्या वर व्यापलेले असतील. अशा जिल्ह्यांचा या चौथा लेबल मध्ये समावेश आहे.

*पाचवी लेव्हल — या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड ते 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेली असतील.

लग्न सोहळ्यासाठी नियम

राज्य शासनाच्या नियमावलीनुसार पहिल्या लेवल मध्ये येणाऱ्या ठिकाणी लग्नसोहळे कोणत्याही निर्बंध शिवाय सुरू राहतील. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये लग्न सोहळा मध्ये 50 टक्के क्षमतेने विवाह सोहळा पार पडण्याची अनुमती देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी ही 50 टक्के क्षमतेची नियम लागू होतील. चौथा लेवल मध्ये लग्नसोहळ्यासाठी 25 उपस्थितांना परवानगी देण्यात आली आहे. तर पाचव्या टप्प्यांमध्ये हे नियम आणखी कठोर करत लग्न सोहळा फक्त कुटुंबीयांपुरता सीमित ठेवण्यात आला आहे.

लेव्हल नुसार काय सुरु काय बंद

लेव्हल 1

— सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरू होणार मोल दुकानं मल्टिप्लेक्स नाट्यगृह नियमितपणे सुरू होणार.
— लोकल सेवा पूर्ववत होईल मात्र स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला निर्बंध घालण्याची मुभा असेल.
— जिम सलुन ब्युटी पार्लर स्पा वेलनेस सेंटर्सना परवानगी सार्वजनिक ठिकाणी मैदाने खुली होतील.
–सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत होईल इथे जमावबंदी नसेल.
— खाजगी कार्यालय सुरू होतील तरी शासकीय कार्यालय शंभर टक्के क्षमतेने सुरू होतील.
— विविध खेळ चित्रीकरण सामाजिक-सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल.
— लग्न सोहळा अंत्यविधी बैठका निवडणूक यावर कोणतेही बंधन नसते याभागात जमावबंदी नसेल.
–पहिल्या टप्प्यात आंरजिल्हा प्रवासाला मुभा असेल.

लेव्हल -२

– 50 टक्के क्षमतेने रेस्टॉरंट सुरु राहतील
– मॉल्स आणि सिनेमगृह 50 टक्के सुरु राहतील
– सार्वजनिक जागा, मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरु राहतील
– बांधकाम क्षेत्रातील पूर्ण कामे सुरु राहतील
– कृषी क्षेत्रातील कामे पूर्ण सुरु राहतील
– ई सेवा पूर्ण सुरु राहिल
– जिम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील
– बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने सुरू राहतील
– जिल्हयाच्या बाहेर खाजगी वाहन , बसेस, इतर राज्यात जाणारी लोकल सेवा, टॅक्सी यांना परवानगी आहे. मात्र पाचव्या स्तरातील जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची आवश्यकता असेल.

लेव्हल -३

– अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते ४ वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते ४ वाजेपर्यंत सुरू राहतील अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद राहतील
– मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील
– हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत खुली रहातील. दुपारी 2 नंतर पार्सल सेवा सुरू राहिल. शनिवार आणि रविवार बंद राहतील.
– सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 यावेळेत सुरू रहातील
– खाजगी आणि सरकारी कार्यालयात 50 टक्के क्षमतेने उपस्थिती राहील
– इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील
– सिनेमा चित्रीकरणाला स्टुडीओ मध्ये परवानगी असेल
– सामाजित, सांस्कृती, मनोरंजनात्म कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील (सोमवार ते शुक्रवार)
-लग्न सोहळे 50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार 20 जणांची उपस्थिती, इतर बैठका 50 टक्के उपस्थित राहील
– कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील
– दुपारी 2 वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहिल
— जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी खाजगी वाहन , बसेस, इतर राज्यात जाणारी लोकल सेवा, टॅक्सी यांना परवानगी आहे.पाचव्या स्तरातील जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची आवश्यकता असेल.

लेव्हल -४

– अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) उघडी राहतील
– अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं पुर्ण वेळ बंद रहातील
– सिनेमागृह, मॉल पूर्णपणे बंद राहतील
– हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरू राहील
– सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 सुरू रहातील (सोमवार ते शुक्रवार)
– अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालयात फक्त 25 टक्के उपस्थिती राहील
– शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थिती
– स्पोर्टसमध्ये आईटडोर सकाळी 5 ते 9 (सोमवार ते शुक्रवार) सुरु राहतील
– कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमालाल परवानगी नाही
– लग्न सोहळ्यासाठी 25 लोकांची उपस्थिती, अंत्यसंस्कारसाठी फक्त 20 लोकांची उपस्थिती बंधनकारक
– राजकीय किंवा इतर बैठका 50 टक्के क्षमता राहील
– ज्या ठिकाणी कामगारांच्या रहाण्याची सोय आहे अश्याच ठिकानाची बांधकामं सुरू रहातील
– कृषी कामे दुपारी 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहतील.
– ई कॉर्मस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील
-सलून आणि जीम 50 टक्के क्षमता सुरू राहील पण एसीचा वापर करता येणार नाही
– बसेस 50 टक्के क्षमतेने सुरु राहील. उभे प्रवासी नाही
– संचारबंदीचे नियम लागू राहतील
-जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी खाजगी वाहन , बसेस, इतर राज्यात जाणारी लोकल सेवा, टॅक्सी यांना परवानगी आहे.पाचव्या स्तरातील जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची आवश्यकता असेल.

लेव्हल -५

सध्या पाचव्या टप्प्यात एकही जिल्हा नाही. जर पुढील आठवड्यात जास्त रुग्णसंख्य वाढली तर पाचव्या टप्प्यामध्ये समावेश होईल.

Leave a Comment