Maharashtra Weather Updates : पाऊस 10 दिवस सुट्टीवर; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला काय?

Maharashtra Weather Updates 2 june
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Weather Updates । मागील १० दिवसांच्या मुसळधार पावसानानंतर आता महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच बदललं आहे. २ दिवसापासून पावसाने उघडीप घेतल्यानंतर खडखडीत ऊन पडलं आहे. बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली असून आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. कमीत कमी पुढील १० दिवस तरी पावसाची शक्यता नाही. म्हणजेच 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन महाराष्ट्र कृषी विभागाने केलं आहे.

बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या (Maharashtra Weather Updates) प्रवासाची गती कमी झाली असून आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान १० जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी व राज्यात काही भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बदललेल्या या वातावरणामुळे राज्यातील कमाल तापमानात वाढ होईल. या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

हवामान विभागाचा अंदाज काय? Maharashtra Weather Updates

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 1 जून रोजी मुंबईसह ठाण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर पालघरमध्ये हलक्या सरी कोसळतील. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ३ जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भात प्रामुख्यानं वर्धा, अमरावती, यवतमाळ या भागांमध्ये पावसाची हजेरी असेल. 2-3 जूनला नाशिक, सोलापूरमध्ये हलक्या सरी कोसळतील. 7-8 जून दरम्यान पुन्हा पाऊस असेल, त्यानंतर पुन्हा 4 दिवस पाऊस विश्रांती घेईल.