गाड्या पार्किंगचा वाद टाळण्यासाठी महारेराचा मोठा निर्णय; बिल्डरला बसणार दणका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।आपल्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात घरे खरेदी करण्याचे प्रमाण वाढलं आहे. त्यातही शहरी भागात घरांची विक्री जास्त प्रमाणात झाली आहे. मात्र घर खरेदी करताना त्याखाली असलेल्या गाड्या पार्किगच्या जागेवरून (Vehicle Parking) अनेकदा आपल्याला वाद झाल्याचे पाहायला मिळते. आजकाल काही ठिकाणी घर खरेदी करण्यासोबत पार्किंगची जागाही खरेदी केली जाते. परंतु तरीही वादावादी काही कमी होत नाही. याच पार्श्वभूमीवर गाड्या पार्किंगचा वाद टाळण्यासाठी महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरण (महारेरा) ने (MahaRERA) मोठे पाऊल उचलले आहे. त्यानुसार बिल्डरने यापुढे करारनाम्यात पार्किंगबाबत संपूर्ण तपशील देणे बंधनकारक असेल असा निर्णय महारेराने घेतला आहे.

इमारतीच्या बीममुळे वाहनांच्या पार्किंगमध्ये अडथळा येत आहे, पार्किंगमध्ये वाहन व्यवस्थित लावता येत नाही, तसेच गाड्यांचा दरवाजा बाहेर पडण्यासाठी उघडता येत नाही, जागा अपुरी आहे, अशा विविध तक्रारी गृहनिर्माण नियामकाला मिळाल्या होत्या. महारेराने या तक्रारींची गंभीर दखल घेतली असून विक्री आणि वाटप पत्रासाठी करारासह परिशिष्ट बद्दल मॉडेल मसुदा जारी केला. भविष्यात अशा समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून नवे परिपत्रक जारी केले आहे.

महारेराने परिपत्रकाच्या परिशिष्टानुसार, कायदेशीर कागदपत्रांमध्ये समाविष्ट करण्यासाठी एक मॉडेल मसुदा खंड जारी केला आहे, ज्यामध्ये इमारतीतील पार्किंगची संख्या, पार्किंगची लांबी, उंची, रुंदी, पार्किंग ब्लॉकचे स्थान इत्यादी सर्व डिटेल्स देण्यात येणार आहे. हे स्टॅंडर्ड कलम नंतरच्या टप्प्यावर कोणतीही संदिग्धता किंवा विवाद टाळण्यासाठी आहे आणि प्रवर्तकांनी हे तपशील वाटप पत्र आणि विक्री करारासह जोडणे आवश्यक आहे. महरेराच्या नियमांनुसार, बिल्डर ओपन पार्किंग स्पेसची विक्री करु शकत नाही. तसंच, पार्किंगमध्ये गाडी उभी करण्यावरुन वाद-विवाद होणार नाहीत यासाठी रेराने ओपन पार्किंग स्पेसमध्ये मार्किंग करण्याचा आदेश देण्यात आला आहे.