हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदू धर्मात महाशिवरात्रीला (Mahashivratri 2023) अनन्यसाधारण महत्त्व आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. असे मानले जाते की या शुभ दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. यंदा महाशिवरात्री 18 फेब्रुवारी 2023 रोजी साजरी होणार आहे. या दिवशी जे सर्व नियम पाळून भगवान शंकराची पूजा करतात त्यांना भोलेनाथाचा आशीर्वाद नक्कीच मिळतो, भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, त्यांची सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते.
महाशिवरात्रीच्या (Mahashivratri 2023) दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी . यानंतर शंकराच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालावे. त्यांना केशरमिश्रित पाणी अर्पण करून दिवा लावावा. शंकरच्या मूर्तीला बेलाची पाने, भांग, धतुरा, तुळशी, कमलगट्टा, फळे, मिठाई, अत्तर आणि दक्षिणा अर्पण करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराण वाचावे.
महाशिवरात्रीच्या दिवशी करा ‘हे’ खास उपाय- Mahashivratri 2023
शंभो महादेवाला बेलाची पाने खूप आवडतात. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तांनी भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करावे. दूध, दही आणि मधाने शंभो महादेवाचा अभिषेक करावा. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री या चारही वेळी रुद्राष्टाध्यायीचे पठण करावे. जर तुम्हाला रुद्राष्टाध्यायी पाठ करता येत नसेल तर तुम्ही ‘ओम नमः शिवाय’ असा जप करू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राक्ष धारण करून ‘ओम नमः शिवाय’ हा जप केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो.
महाशिवरात्रीच्या (Mahashivratri 2023) दिवशी शिवलिंगाची पूजा करणे श्रेष्ठ असल्याचे म्हंटल जाते. त्यामुळे या दिवशी घरामध्ये स्फटिक शिवलिंगाची स्थापना करून त्याची रोज पूजा करावी. असं केल्यास तुमच्या घरातील सर्व नकारात्मक प्रभाव दूर होतील आणि घरात कोणत्याही प्रकारचा वास्तुदोषाचा अशुभ प्रभाव पडत नाही. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर महामृत्युंजय मंत्राचा १.२५ लाख जप केल्याने व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळू शकते. मृत्युन्जय मंत्राचा नियमितपणे जप केलयास जीवनातील सर्व अडचणी मधून तुमची सुटका होईल.